पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात दारूच्या नशेत घरात घुसून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादी नुसार दि.३१ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दीपक धोंडू जाधव हा पिडीत अल्पवयीन मुलीच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. यावेळी पिडीत मुलीची आई-वडील घराबाहेर होते. संशयित आरोपी दिपक जाधव याने दारुच्या नशेत घरात घुसल्यानंतर पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. यावेळी पिडीतेची आई घरात आल्यावर संशयित आरोपी दीपक जाधव याने तिला देखील चापटांनी मारुन निघून गेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनिरीक्षक विजया वसावे या करीत आहेत.