चेन्नई (वृत्तसंस्था) ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम युवराज सिंगच्या नावावर होता. त्याला २०१५ साली दिल्ली डेयरडेव्हिल्सनं तब्बल १६ कोटी रुपये देऊन खरेदी केलं होतं. गेल्या सहा वर्षांपासून अबाधित असलेला युवराजचा रेकॉर्ड मोडला आहे. मॉरीसला राजस्थान रॉयल्सनं १६ कोटी २५ लाख रुपयांना खरेदी केलं आहे.
मॉरिसनं भारताच्या युवराज सिंहचा विक्रम मोडीत काढला आहे. युवराजला दिल्लीनं १६ कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. २०२१ च्या आयपीएल लिलावात ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सनं १६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं आहे. ७५ लाख रुपयांची मूळ किंमत असणाऱ्या ख्रिस मॉरिसला खरेदी करण्यासाठी संघमालकांमध्ये रस्सीखेच झाली. आयपीएल लिलावाच्या आजवरच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूला मिळालेली ही सर्वात जास्त रक्कम आहे. मॉरीसला खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्स (MI) रॉयल चॅलेंजर्स बंगुळरु (RCB) पंजाब किंग्स (PKBS) यांच्यात जोरदार चुरस रंगली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं आपल्या जुन्या खेळाडूला खरेदी करण्याचा जोरदार प्रयत्न केला. तर मुंबईला ट्रेंट बोल्टचा साथीदार म्हणून मॉरीस हवा होता. या दोन्ही टीमनं माघार घेतल्यानंतर पंजाब आणि राजस्थानमध्ये जोरदार चुरस रंगली. त्यामध्ये अखेर राजस्थान रॉयल्सनं बाजी मारली. आता मॉरीस राजस्थानच्या टीममध्ये आल्यानं जोफ्रा आर्चरचा बॉलिंगवरील ताण कमी होईल अशी आशा राजस्थानच्या फॅन्सना आहे.
आरसीबी, चेन्नई, पंजाब आणि राजस्थान या संघानं ख्रिस मॉरिसला आपल्या संघात घेण्यासाठी रस दाखवला. मात्र, राजस्थान संघानं १६ कोटी २५ लाख रुपये खर्च करत आपल्या संघात घेतलं आहे. ख्रिस मॉरिसनं गतवर्षीच्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना ९ सामन्यात ११ बळी घेतले होते. गेल्या आयपीएलच्या लिलावत मॉरिसला १० कोटी रुपयांत आरसीबीनं खरेदी केलं होतं. मात्र, यंदा आरसीबीनं मॉरिसला करारमुक्त केलं होतं.