हरियाणा (वृत्तसंस्था) हरियाणातील पलवलमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. हा खून मृताच्या पत्नीसह त्याच्या भाच्याने केला होता. विवाहबाह्य संबंधांमध्ये अडसर ठरत असल्यामुळे हा खुन करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलवलच्या होडल भागात राहणाऱ्या महेश यांनी ९ ऑक्टोबर रोजी होडल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ८ ऑक्टोबर रोजी त्यांचा लहान भाऊ ताराचंद हा नेहमीसारखं शहरातील नर्सिंग होममध्ये कामासाठी गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न पोहोचल्याने त्यांनी त्याचा शोध सुरू केला.
दरम्यान, ताराचंद यांच्या भावाची त्यांची मोटारसायकल हसनपूर रस्त्याच्या दिशेने कच्च्या रस्त्यावर दिसली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांचा भाऊ ताराचंद हा तेथे दुचाकीजवळ बेशुद्धावस्थेत पडला होता. ज्यांच्या पाठ, तोंड आणि नाकातून रक्त येत होते. ताराचंदला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.