जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह. समाज मर्यादित या संस्थेच्या स्वीकृत संचालकपदी अॅड. कुणाल बन्सीलाल पवार (रा. हिरा शिवा कॉलनी, जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थेचे प्रभारी मानद सचिव वीरेंद्र भोईटे यांनी अॅड. कुणाल पवार यांना नुकतेच नियुक्तिपत्र प्रदान केले. अॅड. पवार या संस्थेचे विद्यार्थी असून त्यांनी विद्यार्थी ते स्वीकृत संचालकपद असा प्रवास पूर्ण केला आहे. दरम्यान, अॅड. पवार हे राष्ट्रवादीचे देखील पदाधिकारी आहेत. तसेच त्यांनी विद्यापीठातील भोंगळ कारभारावर अनेकदा तक्रारी केल्या आहेत.