मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी कॉग्रेसचे (NCP) नेते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या गौप्यस्फोटानं राजकारणात (Politics) खळबळ उडाली आहे. माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे. ठाण्यातील शिवसेनेचे (Shiv Sena) नेते व आव्हाडांमधील राजकीय हेवेदावे जगजाहीर आहेत. आता हा वाद अधिकच चिघळल्याचे आव्हाडांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.
आव्हाड म्हणाले की, आघाडी व्हावी ही माझी इच्छा आहे, पण तुम्हाला करायचीच नसेल तर त्याला कोण काय करणार, माझाच जर राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला तर मी बतावात्मक भूमिका घेणार की नाही असे देखील ते म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले की, माझ्या मतदार संघातील जागा 23 वरून 18 वर आणल्या, तिथंच लोकल याच्यात आमच्या मारामाऱ्या झाल्या असत्या. त्यातच कळव्याचा एक वॉर्ड बनवताना तो मुंब्रा पर्यंत नेला, निवडणूकीला लागणारं कुठलंही गणीत लावलं गेलं नाही असे ते म्हणाले. पालकमंत्री असे प्लॅन करत नाहीत, आयुक्तांनी त्यांच्या मनाने केला असेल करतात. एकून चोविस जागा आहेत, त्यात सात हिंदू जागा आहेत , त्यामुळे त्याच्यात मला मुस्लिम द्वेशाचा प्रकार असल्याचे दिसते असे आव्हाड म्हणाले.
ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देखील इतका त्रास झाला नाही, ठाण्यात आघाडी व्हावी हे माझं मत आव्हाड यांनी व्यक्त केलं. मी एकनाथ शिंदेंवर थेट आरोप करणार नाही, त्यांनी मला असं कळलं होतं की, एकनाथ शिंदेंनी असा निरोप दिला होता की, ५१-२१ होऊद्या, ज्यामुळे वाद होणार नाहीत. या दरम्यान माझ्यामते ठाण्यात आघाडी व्हावी त्यात दोघांचा फायदा असल्याचे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.