मुंबई (वृत्तसंस्था) मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करुन खार पोलीस स्टेशनमधला सीसीटीव्ही फूटेज शेअर केलं आहे. या फूटेजमध्ये राणा दाम्पत्य खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पीत असताना दिसत आहे. सोबतच पाणी देखील त्यांच्यासमोर आहे.
नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर २३ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यातच रात्र काढावी लागली. यावेळी त्यांना आपल्याला पिण्यासाठी पाणी दिलं नाही ना वॉशरुमला जाऊ दिलं. तसेच आपण मागासवर्गीय असल्यानं पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्याला पाणी देण्यास नकार दिला, असा गंभीर आरोप राणा यांनी खार पोलिसांवर केला होता.
नवनीत राणा यांनी काल हा आरोप केला होता त्यानंतर एक दिवसानं आज मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खार पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेजची एक क्लीप ट्विट केली आहे. या ट्विटमध्ये खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे दोघेही पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी दिलेला चहा पिताना दिसत आहेत. हा व्हिडिओच सर्व काही सांगत असल्याचं सूचकपणे संजय पांडे यांनी म्हटलं आहे.
















