पुणे (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘लाव रे तो व्हिडीओ…’ च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे.
रोहित पवार यांनी दोन ट्विट करून राज यांना उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचं असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे साहेब हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘लाव रे तो व्हिडीओ…’ च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.