जळगाव (प्रतिनिधी) गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांना कोरोनाची लागण झाली होती. या काळात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देसले यांच्या तब्येतीची विचारणा केली तसेच कोरोनाच्या आजारपणात सहकार्यही केले. या सहकार्याबद्दल योगेश देसले यांनी अजित पवारांना भावनिक पत्र लिहिले आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले जळगाव यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्यांना कोरोनाच्या आजारपणात केलेल्या सहकार्याबद्दल लिहलेले भावनिक पत्रात म्हंटले आहे की, गेल्या महिन्यात १९ फेब्रुवारी रोजी मला कोरोना झाल्याची बातमी आपणास वर्तमानपत्राच्या माध्यमातून कळली. आणि २१ रोजी भल्या पहाटे म्हणजेच सकाळी ७ वाजता आपण मला आधी पर्सनल नंबरवरून म्हणजेच unknown number वरून कॉल केला तसेच नंतर देवगिरी बंगल्यावरून दोन कॉल केले. मात्र आजारपणात झोपेत आणि मोबाईल सायलेंट असल्याने ते मिस झाले. जेव्हा उठलो तेव्हा माझा फोन बघितला आणि डोळ्यातली झोप एका क्षणात गायब झाली. कारण जे बघतीले ते अनपेक्षित होतं. आपले जवळपास तीन कॉल माझ्याकडून मिस झालेले होते. माझी घालमेल सुरू झाली. आपल्याशी परत आता कस बोलू यावर विचार करत मी आपले स्वीय सहाय्यक श्री ढिकले यांना कॉल केला. तेव्हा सकाळीच आपण ९ वाजता मंत्रालयात गेल्याचे कळले. मग मी त्यांच्याकडे निरोप ठेवला मला सकाळी दादांचा कॉल होता. माझ्याकडून मिस झाला. त्यावर त्यांनी सांगितलं मी दादांना निरोप देतो.
दिवस गेला सायंकाळी साधारण ७.३० मी जेवण करत असताना माझा फोन वाजला आणि त्यात DCM for maharashtraa अस नाव असलेला नंबरवरून आलेला कॉल दिसला.कॉल रिसिव्ह केल्यावर तिकडून विचारणा झाली योगेश देसले बोलताहेत का? होय! …उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बंगल्यावरून बोलतोय मा.दादा आपल्याशी बोलणार होते. मी म्हणालो द्या..! वेटिंग बेलनंतर जो आवाज होता योगेश! कोरोना खूप वाढलाय, तुलाही झालाय अस कळलं काळजी घे, मी म्हणालो हो दादा सद्या उपचार घेतोय! होय तरीही काळजी घे! हो दादा आपणही काळजी घ्या! यावर दादा म्हणाले ठीक आहे. आणि संवाद संपला.एकूण मिनीटभराचा तो कॉल असेल मात्र त्यामध्ये दादां तुमची माझ्यासारख्या कार्यकर्त्याप्रति जी संवेदना होती ती लाख मोलाची आणि खऱ्या आधाराची होती. दादा आपलं ते मिनीटभराच बोलणं माझ्यासाठी काय होत हे मला शब्दात सांगणं शक्य नाही.
काही दिवसांनी म्हणजे टेस्टिंगच्या ७ व्या दिवशी माझी तब्बेत अचानक खालावली आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने ही माहिती आपल्याला कळली. दादा आपण बजेट अधिवेशनाच्या तयारीत होतात आणि अश्याही परिस्थिती आपण मला दुसऱ्यांदा कॉल केला. सकाळी ८ वाजता पुण्याच्या निवासस्थानावरून एक कॉल आला. योगेशजी! मुसळे बोलतोय! दादा आपल्याशी बोलणार होते. तिकडून अचानक तोच आवाज त्यात कडकपणा होता, मात्र हळवेपणा व काळजी जास्त होती.योगेश काय तब्बेतीच चालवले ! तुझ्या घरच्यांचा मला मॅसेज होता. काय झालं? मी बोलताना माझा आवाज खोलवर निघाल्यावर दादांच्या लक्षात आलं. मला विचार कुठल्या ठिकाणी ऍडमिट आहेस?
मुसळे यांच्याकडे सर्व माहिती दे! आणि काळजी करू नकोस मी बघतो काय ते तू आधी बरा हो! एवढं बोलून फोन ठेवला. मी मुसळे साहेबांकडे माहिती दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मानस हॉस्पिटलचे संचालक सुनीलभाऊ भंगाळे यांना कॉल करून काय सांगायच ते सांगितलं आणि परत मला कॉल करून बोलणं झाल्याचे कळविले. हॉस्पिटलमध्ये जवळपास १२ दिवस ऍडमिट राहिल्यानंतर मला त्यांनी आपण आता घरी जाऊन आराम करा कुठलीही काळजी करू नका आपल्यासाठी उपमुख्यमंत्री साहेबांचा कॉल आलेला होता. एवढंच सांगितलं.
दादा त्या वेळेस हॉस्पिटल सोडताना देवाच्या सोबत आपले देखील आभार मानले आणि डोळ्यातून एक समाधानाचे आनंदाश्रू तरळले हा प्रकार तिथल्या सर्वांनीच पाहिला. आणि टाळ्या वाजवून मला हॉस्पिटलमधून निरोप दिला. मा.सुनीलभाऊ भंगाळे यांनीही आपल्या सांगितल्याप्रमाणे व आमच्या मैत्रीच्या खातर सर्वतोपरी सहकार्य केले. आपणास पत्र लिहतांना मला आताही आपल्या ह्या प्रेमाबद्दल काय व्यक्त व्हावं हेच कळत नाहीये. मात्र हे जे मी लिहल त्यातून आपल्याबद्दल आपल्या हळव्यापणाबद्दल आणि कार्यकर्त्याप्रति असलेल्या जाणीवबद्दल सर्वांना कळावं म्हणून लिहल. आता घडलेल्या गोष्टीमुळे मला थोडं मागे जावेसे वाटतंय. व एक प्रसंग सांगावासा वाटतोय. राज्यात कोरोनामुळे लॉकडाउन होते.अश्यात मी मुंबईत काही कामानिमित्त आलो होतो. मंत्रालयात आल्यावर समजले आपण आपल्या दालनात आहात. मी बाहेरून त्या दरवाज्याच्या काचेतून ढुंकून पाहिलं तर नेमकं आपलं लक्ष गेले आणि श्री ढिकले यांना सांगून आपण मला बोलवून घेतलं. मी आता आलो नमस्कार केला.तेव्हा आपसूकच आपल्या डाव्या डोळ्याकडे माझं लक्ष गेले आणि न रहावता मी बोललो डोळा किती लाल झालाय दादा तुमचा! यावर आपण आपल्या नेहमीच्या शैलीत म्हणाले, श्याण्या! तुला माझा डोळा दिसतोय मात्र तू एवढ्या परिस्थिती मुंबईत काय करतोय.योगेश! तुझी आई गेली, वडील गेले घरची जबाबदारी तुझ्यावर का फिरतोस? हे ते शब्द होते दादा जे हृदयाला भिडले. ज्यामध्ये आपलेपणा होता.यावर मी स्पष्ट आपल्याला बोललो होतो. जन्मदाते सोडून गेलेत मात्र तुम्ही आहात ना आश्रयदाते. एवढ्यात माझं जे काम होतं.त्या कागदावर आपला रिमार्कही झाला होता. पण जो रिमार्क आपल्या वाक्यातून आपण त्यादिवशी दिला त्याचा प्रत्यय मला माझ्या कोरोनाच्या आजारपणाच्या काळात आपण केलेल्या सहकर्याबद्दल लक्षात आला. दादा! मलाच कळत नाही कस फेडू हे सगळं, प्रत्यक्ष लवकरच भेट घेईल. परंतु त्याआधी हा पत्रप्रपंच. आजही लिहतांना भावनिक आहे. तुमचा पवार परिवार आणि तुम्ही जपलेली माणसं ह्याच बळावर महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीचे हे कुटुंब अबाधित आहे. मी परत एकदा आपले मनापासून धन्यवाद देतो व थांबतो. असे भावनिक पत्र योगेश देसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लिहिले आहे.