उमरखेड (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी उमरेड तालुक्याचे वतीने विश्वरत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज अभिवादन करण्यात आले.
आज विश्वरत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त हर्षा नंद भगत नागपूर जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वात संविधान चौक उमरेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रवीण गाणार, शैलेश लोखंडे, सुरेश नेवरे, मुकेश बहादुरे, संजू लोखंडे, शशिकांत केसकर इतर पदाधिकारी उपस्थित होते.