बोदवड (प्रतिनिधी) मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज निवासी मनोरुग्ण सहाय्यता केंद्रात भोजन व कपडे भेट देण्यात आले.
बोदवड येथील आत्मसन्मान फौंडेशन संचलित प्रमिलाताई व मोहनराव परिवार निवासी मनोरुग्ण सहाय्यता केंद्रात असलेल्या सर्वांना स्वीकृत नगरसेवक राजेश नानवाणी यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी यामिनी पाटील व कन्या संजना पाटील यांच्या हस्ते सर्वांना भोजन व कपडे भेट दिलेत.
यावेळी स्वर्गीय रंजनसिंग पाटील मित्र परिवार यांच्यातर्फे भोजन देण्यात आले. या मनोरुग्ण साहाय्यता केंद्रात २८ पुरुष व १३ महीला निवासी आहेत. या सर्वांची व्यवस्था व काळजी या केंद्रात घेतली जाते. या निमित्ताने यामिनी व संजना पाटील यांनी या प्रकल्पाची पाहणी करून कामकाजाविषयी माहिती घेत फौंडेशनच्या कामाचे कौतुक केले व भविष्यात या प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगराध्यक्ष आनंदा पाटील, बोदवड एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मिठुलाल अग्रवाल, बोदवड व्यापारी संघटना अध्यक्ष गोपाळ अग्रवाल, नगरसेवक, नगरसेविका व शिवसेना(शिंदे)पक्षाचेचे कार्यकर्ते उपस्थित होते.