चोपडा (प्रतिनिधी) ऑनलाइन बिजनेस हा वाईट नसून त्यापेक्षा ब्रॅण्डेड वस्तू घेण्यावर नियंत्रण आणले तर भारतातला पैसा हा भारतातच राहील, असे प्रखड मत माजी आमदार व उद्योगपती मनीषदादा जैन मांडले. ते दि. 26 रोजी संस्कार मंडपम् मध्ये झालेल्या व्यापारी महामंडळाच्या पदग्रहण सोहळा व अध्यक्ष अमृतराज सचदेव यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
मनीष जैन पुढे म्हणाले की, आजच्या तारखेत व्यापारी हा सर्वांच्या नजरेत चोर झाला आहे. प्रशासनाच्या कोणत्याही अधिकारी आला की, तो व्यापाऱ्याला चोरच समजतो. परंतु व्यापाऱ्याला शासनाच्या कित्येक अधिकाऱ्यांना तोंड देत आपला व्यापार सुरळीत करायचा असतो. तो त्याच्या परिवाराला देखील पूर्ण वेळ देऊ शकत नाही. सकाळी सहा पासून तर रात्री दहापर्यंत तो मेहनतच करत राहतो. या जगात सर्वात जास्त मेहनती शेतकरी असून तदनंतर मात्र व्यापाऱ्यांच्या नंबर लागतो. परंतु शासनाच्या कोणत्याही अधिकारी आला तरी त्याला चोर समजूनच वागणूक मिळत असते. अशा वातावरणात लहान व्यापारी टिकणे कठीण झाले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यापाऱ्याने आधुनिकतेकडे वळावे व आपणही ऑनलाइन बिजनेस करू शकता. तंत्रज्ञानाची जोड घेऊन आपण सोशल मीडियावर आपल्याकडच्या चांगल्या वस्तू आणि कमी दरात विकू शकता.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे चेअरमन ऍड.संदिप पाटिल, मा. मंत्री गुरुमुख जगवाणी,उद्योजक वसंतकाका गुजराथी,मा.आ.कैलास पाटील,वैद्यकीय सम्राट डॉ विकास हरताळकर,पो. नि. के.के पाटिल,ग्रामीण पो.नि. कावेरी कमलाकर, निवृत्त पो नि. श्यामकांत सोमवंशी, जीएसटीचे प्रधान सचिव जगजीवन सुखदेव, महावीर पतसंस्थाचे संस्थापक चेअरमन शांतीलाल बोथरा,जैन समाजाचे मा.संघपती माणकलाल चोपडा, व्यापारी महामंडळाचे मा.अध्यक्ष विजयकुमार अग्रवाल,वरिष्ठ सलाहकार चंदुलाल पालीवाल,महावीर पतसंस्थाचे नवनिर्वाचित संचालक राजाराम पाटिल आदी उपस्थित होते.
यावेळी ऍड.संदीप पाटील, गुरुमुख जगवाणी,शिवसेना प्रमुख आबासाहेब देशमुख, आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमच्या सुरुवातीला आलेल्या मान्यवराचे सत्कार चोपडा व्यापारी महामंडाळाच्या पदाधिकारयांनी केले यावेळी प्रास्ताविक अध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर नेवे,आदेश बरडिया,दिपक राखेचा यांनी केले. अमृतराज सचदेव यांच्या वाढदिवसानिमित्त 11 किलोचा केक लहान मुलांच्या हस्ते कट करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो व्यापारी मंडळी हजर होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील बरडिया,अनिल वानखेडे, संजय कानडे,शाम सोनार,प्रफुल्ल स्वामी, सअजय कानडे, प्रविण राखेचा,लतीश जैन, विपीन जैन,सनी सचदेव,पियुष जैस्वाल,सनम जैन,सिद्धार्थ पालिवाल, तेजस जैन,बापू महाजन, आदिंनी मेहनत घेतली