मुंबई (वृत्तसंस्था) सोमवारी सकाळच्या सुमारास मुंबई महानगर क्षेत्रातील खंडित झालेल्या वीजपुरवठ्याबाबत चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित झाल्याच्या घटनेची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी पावले उचलायला सुरुवात केली आहे. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी चर्चा करतानाच व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. त्यानंतर आता जवळपास सर्वच भागांत वीज पुरवठा सुरळीत झाली असून आता हा प्रकार नेमका घडला कशामुळे?, याचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं पाहायला मिळालं. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळं काही काळासाठी जनजीवन विस्कळीत झालं. सर्वसामान्यांना काही अडचणींचाही सामना करावा लागला. परिणामी भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.