चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एम.ए.मराठी प्रथम वर्ष (पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धती अभ्यासक्रम २०२१-२२) यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन दि.०९ मार्च, २०२२ (बुधवार) रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैय्यासाहेब अॅड.संदीप सुरेश पाटील (अध्यक्ष, महात्मा गांधी शिक्षण मंडळ,चोपडा) उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य डॉ.प्रमोद पवार (अधिष्ठाता, मानव्य विद्याशाखा कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.आशुतोष पाटील (अध्यक्ष,मराठी भाषा अभ्यास मंडळ, कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), ताईसाहेब सौ.आशाताई विजय पाटील (उपाध्यक्ष, महात्मा गांधी शिक्षण मंडळ,चोपडा) तसेच ताईसाहेब डॉ.स्मिता संदीप पाटील (सचिव, महात्मा गांधी शिक्षण मंडळ,चोपडा) आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्रात अभ्यासक्रमाशी निगडीत ३६ विषयांवरील शोधनिबंधांद्वारे चर्चा केली जाणार आहे. या चर्चासत्राच्या उदघाटन सत्रानंतर तीन सत्रात विविध महाविद्यालयांमधून सहभागी झालेले अभ्यासक व निबंधवाचक शोधनिबंधांचे सादरीकरण करणार आहेत. यात पहिल्या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.वासुदेव वले (प्रभारी प्राचार्य,एस.एस.एम.एम.कॉलेज,पाचोरा), दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.जे.एफ.पाटील (प्राध्यापक ,मराठी विभाग, भुसावळ कला,विज्ञान आणि पी.ओ.नाहटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ) आणि तिसऱ्या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.फुला बागूल (उपप्राचार्य, एस.पी.डी.एम.महाविद्यालय, शिरपूर) हे उपस्थित राहणार आहेत.
या चर्चासत्रामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रातील पदव्युत्तर महाविद्यालयांमधील प्राध्यापक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे या चर्चासत्राचे प्रमुख संयोजक प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, चर्चासत्र समन्वयक डॉ.के.एन.सोनवणे (उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख), चर्चासत्राच्या संयोजक सौ.एम.टी.शिंदे तसेच सह-संयोजक डॉ.एम.एल.भुसारे यांनी केले आहे.