मुंबई (वृत्तसंस्था) माझ्या विरोधात कट कारस्थान केलं. यासाठी चाव्हाण यांच्या विरोधात मी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. तसेच याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली आहे. त्यामुळे फडणवीसांनी विधानसभेत टाकलेल्या पेनड्राव्ह बॉम्बचे धमाके काही दिवसातच दिल्लीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला. या व्हिडिओच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोपांची सरबत्ती केली. ज्या भाजप नेत्यांचा त्यात उल्लेख होता त्यात आमदार गिरीश महाजन यांचेही नाव होते. दरम्यान, आता या प्रकरणाची थेट सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना महाजन म्हणाले, प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात मी पुण्यात गुन्हा दाखल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जो पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला होता त्यात सर्वांनी पाहिलं की चव्हाण कसं माझ्या विरोधात कट रचत होते. पोलीस अधिकारी त्यांच्याशी ते चर्चा करत आहेत, रेड कशी करायची याची चर्चा आहे. सरकार मधले प्रमुख मंत्री आहेत त्यांचा उल्लेख त्यात आहे. माझ्या विरोधात कट कारस्थान केलं. यासाठी चाव्हाण यांच्या विरोधात मी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. तसेच याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही केली. कारण या केस मध्ये पोलीस, प्रशासक अधिकारी जे आहेत, विशेष करून सत्ताधारी पक्षातील मोठे नेते आहेत. त्यामुळे पण सीआयडी व्यवस्थित नीट चौकशी कणार नाहीत, आम्हाला सहकार्य मिळणार नाही, म्हणून ही सीबीआय चौकशी हवी, अशी मागणी महाजन यांनी केली आहे.
पोलीस सरकारचे दलाल
तसेच न्यायलयातून आम्ही हा न्याय मिळवून घेऊ. संजय पांडे साहेब आल्यावर आपल्याला कशी मदत मिळेल? तत्कालीन मंत्री कशी मदत करत आहेत? याचा उल्लेख त्यात आहेत, यात षडयंत्र स्पष्ट दिसून येत आहे. आता चव्हाण यांच्या विरोधात तक्रार करून 4 दिवस झाले, वरिष्ठांकडे विषय गेला आहे. जो गुन्हा घडला नाही तो तुम्ही नोंद केला, माझ्याकडे पुरावे असताना अजूनही तक्रार नोंदवून घेत नाही, म्हणून बोलतो पोलिसांकडून आम्हाला मदत मिळणार नाही. पोलीस सरकारचे दलाल म्हणून काम करत आहेत, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे.