जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर, पाळधी, शिरसोली, कुसुंबा, कानळदा, आसोदा, ममुराबाद, नशिराबाद येथील ज्या भगिनी पिंक ऑटो रिक्षा चालवण्यास उत्सुक असतील त्यांच्याकरता मराठी प्रतिष्ठानने झिरो डाउन पेमेंटमध्ये रिक्षा मिळवून देण्याची संधी निर्माण केली आहे.
मराठी प्रतिष्ठान तर्फे लायसन्स, बॅच, कच्चे परमिट, पक्के परमिट बनवण्याकरता प्रशासकीय पाठपुरावा व रिक्षा चालवण्याचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पिंक रिक्षा घेण्याकरता राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा सुद्धा मराठी प्रतिष्ठान करणार आहे.
गेल्या पाच वर्षापासून जळगाव शहरांमध्ये वीस महिला पिंक आटो रिक्षा चालवत आहे व त्यांना महिला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद आहे. ज्या भगिनींची पिंक आटो रिक्षा चालवण्याची इच्छा असेल त्यांनी मराठी प्रतिष्ठानच्या गणपती नगर येथील कार्यालयात आधार कार्ड पॅन कार्ड सह संपर्क साधावा पण नाव नोंदणी करावी.
फक्त वीस महिलांकरता ही संधी उपलब्ध असल्यामुळे तातडीने प्रतिष्ठानच्या ४ मुळे कॉम्लेक्स, स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या बाजूला गणपती नगर कार्यालय या ठिकाणी नाव नोंदणी करावी, अशी माहिती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे (मो.न.-9372007465) यांनी दिली आहे.