जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात सेवा बजावलेले तथा सध्या नेरुळ (नवी मुंबई) येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना नुकतेच पोलीस महासंचालक पदाने सन्मानित करण्यात आले आहे.
1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त कोकण विभागाचे विभागीय आयुक्त कल्याणकर साहेब व नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते नेरुळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना त्यांचे पोलीस खात्यातील प्रशंसनीय कामगिरी बद्दल सन 2022 चे राज्याचे पोलीस महासंचालकयांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रधान करून पोलीस मुख्यालय नवी मुंबई येथे गौरविण्यात आले.
पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी सन २००७ मध्ये गडचिरोली येथे कर्तव्यादरम्यान खुनाच्या प्रकरणामध्ये ८ नक्षलवादी बंदुकीसह अटक केली होती. सन २००८ मध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेला ११ किलो वजनाचा भूसुरुंग ३ डेटोनेटरसह शोधून काढला होता. सन २०१८ मध्ये एन्काऊंटरमध्ये ५४ नक्षलवादी यांना मारण्याच्या मोहिमेमध्ये सहभाग आणि मौजे संभलपूर येथे पोलीस-नक्षलवादी चकमकीमधील ३ नक्षलवादी बंदुकीसह अटक केली होती. तसेच नंदुरबार येथील खून, जळगाव येथील हिंदू-मुस्लिम दंगलीच्या गुन्हयांचा उत्कृष्ट तपास या प्रशंसनीय स्वरुपाचे अत्युत्तम काम केल्याबद्दल १७ वर्षांच्या सेवा कालावधीमध्ये १६९ बक्षीसे प्राप्त केलेली आहेत.