पुणे (वृत्तसंस्था) अमरावती पोलीस दलातील राजपेठ विभाग सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या स्वत: आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भरत शेखा गायकवाड (वय 57) असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. तर पत्नी मोनि गायकवाड (४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (३५) यांचा खून झाला आहे.
अमरावती पोलीस दलात कार्यरत असलेले भारत गायकवाड यांचे कुटुंब पुण्यात वास्तव्याला होते. भारत गायकवाड यांनी पहाटे सव्वा तिनच्या सुमारास गोळीबार केल्याने परिसरात आवाज आला. पत्नी मोनी गायकवाड आणि पुतण्या दीपक गायकवाड यात जागीच मरण पावले. त्यानंतर भारत गायकवाड यांनी स्वतःलाही संपवले. गेल्या शनिवारी सुट्टीवर आले होते. त्यांनी परवाना असलेल्या त्यांच्या खासगी पिस्तूलातून गोळ्या झाडल्या आहेत.
दरम्यान त्यांनी हत्या आणि आत्महत्या का केली हे मात्र समजले नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्यातील बाणेर भागात ते राहत होते. त्यांचे कुटुंब येथे रहात होते. ते अमरावती येथे नेमणुकाला होते. तर त्यांची पत्नी, दोन मुले आणि पुतण्या पुण्यात रहात होते. पोलीस दलात मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या भारत गायकवाड यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले? त्यांनी पत्नी, पुतण्याला संपवून आत्महत्या का केली? असे प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले असून, पोलिसांनी त्या अनुषंगाने आता तपास सुरू केला आहे.