जळगाव (प्रतिनिधी) पोलीस दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना आदराने खुर्चीवर बसवतात, हे चित्र बरोबर नसल्याची खंत भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केली आहे. तसेच सदस्यांना आदराने वागवावे असे आदेश प्रत्येक पोलीस स्टेशनला दिले जावे, असे मतही त्यांनी शांतता कमिटी बैठकीत व्यक्त केले.
यावेळी जिल्ह्यातील शांतता अबाधित रहावी यावर चर्चा झाली. तसेच चर्चा करताना काही मुद्देही पुढे आले. यावेळी बोलताना आमदार सुरेश भोळे यांनी शांतता कमिटी सदस्यांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले केवळ अशांतता निर्माण झाली म्हणून सदस्यांना बोलाविले जाते. त्यांना मान दिला जातो. हे कायम झाले पाहिजे. इतर वेळी मात्र शांतता कमेटीचे सदस्य पोलीस स्टेशनला उभे राहतात आणि पोलीस दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना आदराने खुर्चीवर बसवतात, हे चित्र बरोबर नाही. सदस्यांना आदराने वागवावे असे आदेश प्रत्येक पोलीस स्टेशनला दिले जावे, असे मतही आमदार भोळे यांनी व्यक्त केले.
यावेळी महापौर जयश्री महाजन यांनीही सट्टा, पत्ते या ठिकाणी होणाऱ्या किरकोळ वादातून दंगली होतात. त्यामुळे ते बंद कराव्यात अशी मागणी केली केली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी जिल्ह्यात शांतता कायम रहावी यासाठी सदस्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले.