मुंबई (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर आज मतदान होत आहे. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या २३ आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या ४५ जागांसाठीही आज मतदान होत आहे. १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतीच्या ३३६ जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान होतं आहे.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे १०६ नगरपंचायतींमधील ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या जागा खुल्या गटात समजल्या जाणार आहेत. ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर २७ टक्के जागा या खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आल्या होत्या. २१ डिसेबंरला झालेल्या ११ नगरपंचायतीच्या निवडणुका आणि आज होणाऱ्या निवडणुका यांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे, १८ जानेवारीला होणार आहे. मतदानाला सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरु झालं असून आणि संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदान असेल.
दरम्यान, १९ जानेवारी २०२२ रोजी मागच्या १३ आणि या ४ अशा एकूण १७ प्रभागात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील कामाला लागली आहे. तसेच उमेदवारांसह मतदारांचंही निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे. नगरपंचायतीत कोण बाजी मारणार? किती नव्या चेहर्यांना संधी मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.