मुंबई (वृत्तसंस्था) दक्षिण आफ्रिकामध्ये समोर आलेल्या ओमिक्रॉन संसर्गाने राज्यामध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही सतर्क राहण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमिवर आता राज्यात मंत्रिमंडळाची तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे, यामध्ये राज्यात निर्बंध लागू करणार का? यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
खरंतर, एक डिसेंबरपासून शाळा सुरू होणार होती, पण नव्या संसर्गाचा धोका वाढल्यामुळे हा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता आहे किंवा या निर्णयावर फेरविचार केला जाऊ शकतो. इतकंच नाहीतर राज्यात पुन्हा निर्बंध लागू होणार का?, या सगळ्याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक बोलावली असून यामध्ये चर्चा करणार आहेत. आज मंत्रिमंडळाची तातडीने बैठक होणार आहे. या बैठकीत एक डिसेंबरपासून होणाऱ्या बदलांबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.