जळगाव (प्रतिनिधी) औरंगाबाद क्षेत्र संबंधीत टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद यांनी त्यांच्या कार्यालयात दि. १८ जून, २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता डाक अदालत आयोजित केली आहे.
नागरिकांनी आपल्या तक्रारी संपूर्ण माहितीसह दोन प्रतीत ए.के. धनवडे, सहाय्यक निदेशक, डाकसेवा (जनशिकायत) पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, औरंगाबाद -४३१ ००२ या पत्त्यावर दि. ८ जून, २०२१ पुर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहितीसाठी www.maharashtrapost.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. असे पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद क्षेत्र, औरंगाबाद यांनी कळविले आहे.