नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सामूहिक बलात्काराचा बळी झालेल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी देशभर संताप व्यक्त होत आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्यावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले, यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान राजकीय पक्षांनी यूपी सरकारला लक्ष्य केले असून या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसकडे रवाना झाले आहेत.
भाजप नेते नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांनी ही माहिती स्वतः ट्विट करून दिली आहे. ते असे म्हणाले की, माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.
यूपीमधील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात राजकारण तीव्र झाले आहे. या प्रकरणात विरोधी पक्ष योगी सरकारला लक्ष्य करत आहे. या संदर्भात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आज हाथरस येथे जाणार आहेत. राहुल आणि प्रियंका येथे पोहोचून पीडित मुलीच्या कुटुंबाला भेट देणार आहेत.