धरणगाव (प्रतिनिधी) येथील निळकंठेश्वर हायस्कूल चावलखेडा येथील शिक्षक सुशील हिम्मत भालेराव यांना नुकतेच सोलापूर येथे सन २०२५ चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
शैक्षणिक क्षेत्रात ही त्यांनी अमूल्य असे कार्य केले आहे. आविष्कार फौंडेशन, इंडिया (कोल्हापूर महाराष्ट्र राज्य) ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय, सांस्कृतिक क्षेत्रात
गेली १९ वर्षे राज्यभर कार्यरत आहे. या संस्थेच्या सोलापूर शाखेच्यावतीने प्रा. प्रशांत कुंभार यांना शिक्षण क्षेत्रात करीत असलेल्या विशेष योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी माजी सहाय्यक पोलिस आयुक्त दिपक आर्वे, ज्येष्ठ पत्रकार सचिन वायकुळे, साहित्यीक डॉ. दादासाहेब कोळी, डॉ. दिलीप कोने, आविष्कार फौंडेशन, इंडियाचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार सोलापूर जिल्हाध्यक्ष जब्बार शिकलगार, आविष्कार फौंडेशनचे प्रमुख पदाधिकारी व विविध मान्यवर उपस्थित होते. प्रा.प्रशांत कुंभार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सोलापूर जिल्हा तसेच माण तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.















