एरंडोल प्रतिनिधी । क्रेडिट ॲक्केस ग्रामीण लिमिटेड शाखा एरंडोल यांचेकडून धरणगाव नगरपरिषदेला सामाजिक उपक्रमातून नागरिकांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जनजागृती व्हावी, यासाठी ध्वनिफीत देण्यात आली.
सदरची ध्वनिफीत नगरपरिषदेतर्फे जनजागृतीसाठी रिक्षाद्वारे प्रसारित करण्याचा शुभारंभ आज दि. २८ सप्टेंबर रोजी शिवसेना जिल्हप्रमुख गुलाबराव वाघ यांचा मार्गदर्शनाने, भाजपाचे ज्येष्ठ नेते, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष मा. कडु रुपा महाजन यांनी रिक्षाला हिरवा झेंडा दाखवून जनजागृतीला सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुदास विसावे, नगरसेवक वासुदेव चौधरी,सुरेश महाजन,विजय महाजन,माजी नगरसेवक करण वाघरे, सुदेश पारेराव, कमलेश बोरसे, योगराज खलाने, किशोर महाजन, न. पा. कर्मचारी गणेश गुरव आदी उपस्थित होते.