चाळीसगाव (प्रतिनिधी) स्विमिंग असोसिएशनची वार्षिक स्नेह मिलन सभा व कोजागिरी कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. यावेळी स्विमिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र मांडे तर सचिवपदी ॲड. रणजीत पाटील यांची सर्वानुमते फेरनियुक्ती करण्यात आली.
स्विमिंग असोसिएशनचे अध्यक्षपदी राजेंद्र मांडे, उपाध्यक्षपदी दिगंबर (काळूशेठ) दायमा व सेक्रेटरीपदी ॲडव्होकेट रणजीत पाटील यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. स्विमिंग असोसिएशनच्या कार्याचा वार्षिक आढावा यावेळी रंजीत पाटील यांनी घेतला तर योगा व व्यायामाचे महत्त्व योगशिक्षक नारायण मांडवडे यांनी सांगितले. तर असोसिएशनचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी चाळीसगावकर जलतरण व्यायाम प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने पोहण्याचा व्यायाम करावा व आपले आरोग्य उत्तम ठेवण्याबरोबरच आपला परिवार आणि समाज निरोगी कसा राहील याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे जलतरण तलाव नियमित चालू राहावा, यासाठी प्रशासन व व्यायाम प्रेमी यांचे एकत्रित योगदान असल्यास चाळीसगावचा जलतरण तलाव उत्तम स्थितीत राहून चाळीसगावच्या सौंदर्यात भर घालेल, असे आपल्या मनोगत सांगितले.
यावेळी जलतरण तलावाचे माजी अध्यक्ष रमेश सपकाळे, राजेंद्र बाफना, पवन बंग कोतकर, आबा नगरपालिका बांधकाम विभागाचे दीपक देशमुख चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे एपीआय दीपक बिरारी, सागर ढिकले, नानासाहेब पवार, डॉ.शिरीष पवार, डॉ.नंदकुमार लढे, डॉ.सुतवणे, दिलीप पवार, राजेंद कटारिया, शाम ठाकूर, दिपक ठाकूर, गजानन मोरे, राहूल पवार, जितेंद्र वरखेडे, प्रकाश चौधरी, राजूशेठ सोनजे, टोनी पंजाबी, सुरेश मंधानी, नाना चौधरी, योगेश येवले, योगेश पवार आदी जलतरण प्रेमी व जलतरण तलावाचे व्यवस्थापक महेंद्र चौधरी, जिवरक्षक शाम जाधव, सागर जाधव यांच्यासह आदी उपस्थित होते.