चोपडा (प्रतिनिधी) शहरातील सामाजिक कार्यात आघाडीवर असणारे गुंजन एजन्सीचे संचालक राजेंद्र पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना नुकतेच जळगाव येथे सप्तरंग इव्हेंट्स आणि सप्तरंग मराठी चॅनलच्या माध्यमातून खान्देश भूषण 2023 तसेच खान्देश ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राजेंद्र पाटील यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मराठी सिने अभिनेते विजय पाटकर मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या हस्ते सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.हा देखणा सोहळा नुकताच जळगाव येथे संपन्न झाला याचे ओचित्य साधत चोपडा येथील गुंजन एजन्सी परिवारातील संचालक व कर्मचारी वृद्धांच्या वतीने आज दिनांक १८ रोजी राजेंद्र पाटील यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन पारिवारिक पद्धतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी एजन्सीच्या संचालिका सौ अर्चना राजेंद्र पाटील,राजेंद्र पाटील (दाजी) जी बी शिंदे, जगदीश पाटील,राहुल राजपूत,मिलिंद पाटील सुनील पाटील,शाहरुख शेख नजीर,विकास देशमुख,भाईदास कोळी,विठ्ठल पाटील,जी.व्ही. चौधरी,मिलिंद कोळी,पंकज पाटील,शुभम चौधरी, राहुल पाटील,विकी जैन, चेतन मराठे आदी सदस्य हजर होते.












