जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ६८१ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ८११ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ६०, जळगाव ग्रामीण-१६, भुसावळ- ८२, अमळनेर-२९, चोपडा-६८, पाचोरा-०४, भडगाव-०३, धरणगाव-२९, यावल-३२, एरंडोल-४४, जामनेर-१६, रावेर-४७, पारोळा-३५, चाळीसगाव-९२, मुक्ताईनगर-७२, बोदवड-३४, इतर जिल्ह्यातील-१८ असे एकुण ६८१ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १३३ हजार ८९३ पर्यंत पोहचली असून १२१ हजार ७८२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २३९५ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९७१६ रुग्ण सध्या उपचार घेताय.
दिलासादायक
*जळगाव जिल्ह्यात आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या (१३० ने) जास्त.
*ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही (१३९ ने) झाली कमी.
*दैनंदिन बाधितांच्या मृत्यूतही (३ ने) घट झाली.