धरणगाव(प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन मंडळ, १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी तथा जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव याच्या संयुक्त विद्यमाने, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित जळगाव ते अमळनेर सायकल रॅलीचे, मंगळवारी धरणगाव बस स्थानकाजवळ स्वागत झाले.
पी.आर.हायस्कूल व कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि इंदिरा गांधी विद्यालयाच्या स्काऊट, गाईड पथकाने रॅलीचे स्वागत करत पुष्पवृष्टी केली. सायकल रॅलीत महिलांचा विशेष सहभाग होता. रॅलीत सहभागी अधिकारी नागरिकांसाठी सरबत, फलाहाराची व्यवस्था एनसीसीने केली होती. या रॅलीत जळगाव १८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडींग ऑफिसर कर्नल प्रवीण धिमन, ४९ महाराष्ट्र बटालियन चे कमांडींग ऑफिसर कर्नल विवेक भटारा, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित, नूतन मराठा महाविद्यालयाचे लेफ्टनंट शिवराज पाटील, एम.जे कॉलेजचे प्रा.बोरसे, विनोद पाटील, हवालदार काकलिज, नेहरू युवा केंद्राचे नरेंद्र डागर यांच्यासह ७५ अधिकारी कर्मचारी, भुसावळ, पाचोरा ,जळगाव येथील एनसीसीचे २५ कॅडेट सहभागी झाले होते.














