TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अवकाळी पावसाने बोदवड तालुक्यात झालेल्या नुकसानीची रोहिणी खडसे यांनी केली पाहणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2024
in बोदवड, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) एकीकडे कडक ऊन तापत असताना अंगाची लाहीलाही होत असताना काल (दि.९) मंगळवार रोजी मराठी नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी दुपारी अचानक आलेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने बोदवड तालुक्यातील अनेक गावात घरांची मोठया प्रमाणावर पडझड झाली तसेच शेतातील रब्बीचे पिके भुईसपाट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

आज (दि.१०) बुधवार रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील वाकी, मुक्तळ, वराड, जलचक्र येथे भेट देऊन पडझड झालेल्या घरांची व शेत शिवाराची पाहणी करून तहसीलदार यांच्यासोबत संपर्क साधून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत चर्चा केली. एकीकडे नेते मंडळी लोकसभा निवडणुकीत व्यस्त असताना शेतकरी बांधवांवर आलेल्या अस्मानी संकटांमुळे शेतकरी व सामान्य नागरिक हतबल झालेले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

सर्व नेते मंडळी राजकीय कार्यात मग्न असताना रोहिणी खडसे यांनी थेट शेतीच्या बांधावर जाऊन शेतकरी बांधवांना धिर दिला व नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिल्यामुळे आपले राजकारण बाजूला ठेऊन रोहिणी खडसे या नेहमी संकटात धावून येत असल्या बाबत बोदवड तालुका वासीयांमध्ये चर्चा सुरू होती.

यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या की, मराठी नूतनवर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा सर्वत्र आनंदात साजरा होत असताना व गुढी उभारून मराठी नूतन वर्षाचे सगळीकडे हर्षोल्हासात स्वागत होत असताना अचानक आलेल्या वादळ आणि अवकाळी पावसाने बोदवड तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली घरांवरील पत्रे उडून गेली त्यामुळे घरातील संसारपयोगी वस्तूंचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघडयावर पडले आहेत.

दुष्काळी छायेत असताना विहिरीत असलेल्या कमी जलसाठ्याच्या सहाय्याने जिवापाड मेहनत घेऊन शेतकरी बांधवांनी घेतलेल्या रब्बीच्या गहू, हरभरा, मका, ज्वारी ,केळीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतातील पिके भुईसपाट झाले आहेत. काढणीवर आलेले पिके भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी बंधूंचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडला असुन उद्विग्न झाला आहे.

जलचक्र बु येथे जि. प .प्राथमिक शाळेवरील पत्रे उडून गेल्यामुळे शैक्षणिक साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. तसेच वादळी वाऱ्यामुळे बोदवड शहरातील कृषी पुरक उद्योग असलेल्या जिनिंग व्यावसायिकांचे सुद्धा मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे हरणखेड येथे विज कोसळून कापूस जळाल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक झळ बसली आहे. आज बोदवड तालुक्यातील वाकी, वराड,जलचक्र,मुक्तळ येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली प्रांत अधिकारी ,तहसीलदार यांच्या सोबत संपर्क साधून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्या बाबत चर्चा केली. तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असुन त्यांच्याकडे नुकसानीचे सरसकट पंचनामे करून आचारसंहिता बाजूला ठेऊन नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळवून देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.

यावेळी माजी सभापती गणेश पाटील,किशोर गायकवाड, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार युवक प्रदेश चिटणीस विजय चौधरी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बोदवड शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर, जितेंद्र पाटील, अतुल पाटील, श्याम पाटील, अमोल पाटील, गजानन पाटील, संदीप घडेकर, अजय पाटील, बोदवड तालुका गटविकास अधिकारी निशा जाधव, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 मार्च 2026 !

March 24, 2026
Next Post

खडकीसिम येथील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिर्डीहून मुक्ताईनगर परतणाऱ्या कुटुंबाच्या वाहनाचा भीषण अपघात

February 24, 2025

हरवलेले कागदपत्र व रोख रक्कम परत केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार !

October 23, 2021

टीईटी घोटाळा : चाळीसगावच्या शिक्षकाकडून मिळाले महत्त्वाचे धागेदोरे !

January 8, 2022

कानळदा येथे गणेशविसर्जनाच्या मिरवणुकीत नाचतांना तरुणाचा मृत्यू !

September 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group