जळगाव प्रतिनिधी : दि. 20 खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित एम जे महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातत दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर बी ठाकरे यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा स्वाती बऱ्हाटे,समन्वयक उमेश पाटील,सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रा संदीप वानखेडे व डॉ रणजीत पाटील मंचावर उपस्थित होते.यावेळी उपप्राचार्य आर बी ठाकरे यांनी राजीव गांधी यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद उपस्थित होते