चोपडा, दि. ३ ऑगस्ट २०२५ (प्रतिनिधी) — गुळीनदी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ रुखणखेडे प्र. चोपडा ता. चोपडा यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक चेअरमन स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त रविवारी सकाळी एकात्मतेचा व प्रेरणेचा संगम घडवणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला. संस्था संचलित आईसाहेब चिंधाबाई निंबाजी पाटील माध्यमिक विद्यालय, माचले येथे झालेल्या या कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण आणि वृक्षारोपण अशा उपक्रमांनी परिसर भारावून गेला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती शैलजा ताई दिलीप निकम, संस्थेचे अध्यक्ष प्रविण देवराव निकम, उपाध्यक्ष जगन्नाथ दामू पाटील, सचिव घनःश्याम निंबाजी पाटील रितेश दिलीप निकम, अमर मधुकर देशमुख , यांसह जगन छन्नू पाटील, आत्माराम पाटील , चंद्रशेखर पाटील शेखर पाटील ,
नितीन पाटील, गुलाबराव पाटील, तुळशीराम पाटील, संतोष पाटील, चंद्रशेखर पाटील, नरेंद्र पाटील, अरूण पाटील, रमेश पाटील, युवराज पाटील, मोहन पाटील, ताराचंद पाटील, बालकृष्ण पाटील, अॅड. मधुकर पाटील, रतिलाल पाटील, श्रीराम कोळी, सतीष पाटील, सुखदेव पाटील, भागवत पाटील, अंकुश मालचे, मोतीलाल भाऊ आदींसह सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. भाईसाहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष व दूध संघाचे संचालक रोहित निकम आणि परिवाराच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्व. भाईसाहेबांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी कार्याचा उल्लेख करत त्यांच्या सोबतच्या संस्मरणीय आठवणी उपस्थितांसमोर मांडल्या. श्रीमती शैलजा निकम यांनी यावेळी नुकतेच राज्यसभा खासदार झालेले पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांच्यावर स्व. भाईसाहेबांनी लिहिलेला लेख सादर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी “आईवडिलांचे उपकार विसरू नका” या विषयावर प्रभावी कविता सादर केली.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
(इयत्ता, नाव, गुण)
१० वी : निकिता लहू भिल (८३.४०%), दिपाली विनोद रूपवते (८२.८०%), यामिनी योगेश पाटील (८२%)
९ वी : साधना नारायण सांगोळे (७७.६७%), दिक्षा योगराज शिंदे (७७%), हर्षदा प्रविण बाविस्कर (७३.६७%)
८ वी : साक्षी ज्ञानेश्वर पाटील (९०.३३%), तनुजा पंडित कोळी (८८.७७%), कल्याणी भीमराव ठाकूर (८६%)
७ वी : राजहंस नवल साळुंखे (८२.४४%), रूपाली नारायण सांगोळे (८२.२२%), बादल विनोद बिल (८१.५६%)
६ वी : गायत्री नितीन पाटील (८७.६१%), आराध्या लहू भिल (८४.५%), वैभवी नथू कोळी (७९.७८%)
५ वी : आरती समाधान रूपवते (८६.५६%), दिव्या सुनील भिल (८२.३१%), पूजा प्रकाश बिल (८१.१३%)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक वसंत पाटील यांनी केले. श्रद्धांजली व शिष्यवृत्ती वितरणाने स्व. भाईसाहेबांच्या कार्याची प्रेरणा पुन्हा एकदा जागवली आणि उपस्थितांना समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याची दिशा दिली.
फोटो …
१.सोबत गुणवंत विद्यार्थ्यां सोबत मान्यवर..
२. वृक्षारोपण करताना मान्यवर