जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव तालुक्यातील सार्वे, जांभोरे, बिलखेडा, भोणे व कंडारी येथे आज शिवसेना शाखा उदघाटन सोहळा आयोजित करण्यात येत आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व जळगाव जिल्हयाचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या आदेशाने हे शाखा उदघाट्न होणार आहे.
कार्यक्रमाची वेळ व गाव
सार्वे येथे ४:३० वाजता
जांभोरे येथे ५:०० वाजता
बिलखेडा येथे ५:२० मिनीटांनी
भोणे येथे ५:४० मिनिटांनी
कंडारी येथे ६:०० वाजता
कंडारी येथे जाहीर सभा घेण्यात येणार आहे.
तरी सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते, महिला आघाडी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध विकास सोसायटी सदस्य, धरणगाव शहरातील नगरसेवक, नगराध्यक्ष, शाखा प्रमुख यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, तालुका प्रमुख गजाजन नाना पाटील, युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील यांनी केले आहे.