धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने आयोजित शिवलिंगार्चन सोहळा गावातील जागृत ऐतिहासिक श्री साजेश्वर महादेव मंदिर येथे सुमारे शेकडो माता भगिनी व बंधूंचा उपस्थित सेवेने संपन्न झाला. त्यात प्रामुख्याने वर्षभर सुवृष्टी व्हावी तसेच शेतीसाठी पिण्यासाठी वापरण्यासाठी पाण्याची सोय व्हावी या हेतुने पर्जन्य राजाला प्राथर्ना करण्यात आली व विशेष सेवा करण्यात आली.
प्रथम श्री भगवान शंकराच्या पिंडीची पंचो पचार पूजा करण्यात आली व सेवेला सुरूवात झाली त्यात गणपती अथर्वशीर्ष शंकराची ध्यान व प्रार्थना श्री रुद्र मराठी शांती मंत्र श्री शिव महिमा स्तोत्र मराठी श्री कालभैरवाष्टक श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र श्रीसूक्त मराठी श्री राम रक्षा १ ते १० श्लोक महामृत्युंजय मंत्र एक प्रणव अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा श्री शिव प्रार्थना 1 वेळा शिव प्रार्थना अकरा वेळा 108 श्री शिवास्टोत्तर नामावली १०८ बेलपत्र वाहून व नंतर आरती श्री भगवान शंकराची सामुदायिक करण्यात आली. व कार्यक्रमांची अतिशय आनंदात व भक्तीमय वातावरणात सांगता झाली.