चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात मध्यरात्री घरात घुसून विवाहितेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, ३१ मे रोजी ३६ वर्षीय पिडीत विवाहिता घरात झोपलेली होती. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास बाबाजी पोपट राजपूत याने अनाधिकृतपणे घरात प्रवेश केला. तसेच पिडीतेचे तोंड दाबून मनास लज्जा उत्पन्न होईल अशा रितीने अश्लील कृत्य केले. एवढेच नव्हे तर पिडीत विवाहितेच्या पती सोबत धक्काबुक्की केली. तसेच कोनाला काही सांगीतले तर तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून बाबाजी राजपूत विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ ओंकार सुतार हे करीत आहेत.