TheClearNews.Com
Friday, August 1, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन इरिगेशनचे चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 27, 2023
in अर्थ, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतातील सर्वात मोठी ठिबक व सूक्ष्म सिंचन आणि केळी व डाळिंब टिश्युकल्चर मध्ये जगातील पहिल्या क्रमांकाची जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने आज चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे एकल तसेच एकत्रित निकाल जाहीर करण्यात आले आहे. आज जळगाव येथे झालेल्या कंपनी संचालक मंडळाच्या सभेत आर्थिक निकाल मंजूर करण्यात आले.

ठळक सकारात्मक बाबी –
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ने रिवूलीसबरोबर ठरवलेला विलीनीकरण करार २९ मार्च २०२३ ला पूर्ण झाला.
३१ मार्च २०२३ रोजी जैन इरिगेशनने एका वर्षाच्या कालावधीत यशस्वीपणे पुनर्रचनेची प्रक्रिया अमलात आणली.
तसेच क्रिसील (CRISIL) व इकरा (ICRA) या दोन्ही क्रेडिट रेटिंग एजन्सीनी जैन इरिगेशनचे पत मानांकना (क्रेडिट रेटिंग) मध्ये सुधारणा करून ते स्टँडर्ड अॅसेट (BBB-) केले आहे.

READ ALSO

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनच्या जळगाव परिमंडलाची कार्यकारिणी जाहीर

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

जैन इरिगेशनचा बँक अकाऊंट हा स्टँडर्ड अॅसेट झाला व तो (बँकांच्या) व्यापारी शाखांना हस्तांतरीत झाला.
एकत्रित निकलात FY23 (आर्थिक वर्ष २०२२-२३) ला व्याजाच्या खर्चाची रक्कम २०० कोटी रुपयांनी कमी झाली. नवीन आर्थिक वर्ष २०२३-२४ ला व्याजाच्या खर्चाची रक्कम एनसीडी (कर्जरोख्यांवरील) व्याजाची रक्कम रोख नसलेली वगळून ३२० कोटी रूपये राहील.

रिवूलीस बरोबर विलीनीकरणाचे रचनात्मक फायदे
निव्वळ किंमतीतील भरपूर वाढ १५२५.१ कोटी रुपये (४१.७ टक्के) : ३१ मार्च २०२२ला ती वाढ ३६५६ कोटी रुपये  होती व  ती ३१ मार्च २०२३ला ५१८१.१ कोटी रुपये एवढी झाली.  कर्जात २६८३ कोटी रुपयांची घट (४१.९ टक्के) : संपूर्ण एकत्रित कर्ज ३१ मार्च २०२२ अखेर ६४०४.९ कोटी रुपये होते. ते ३१ मार्च २०२३ अखेर ३७२१.९ कोटी रुपये इतके राहिले. कंटींजेंट लायाबिलीटी (Contingent Liability) देण्याच्या रकमेत ३० कोटी अमेरिकन डॉलर्सने घट. कर्जाचे कर,व्याज, कर व घसारापूर्व नफ्याशी असलेले गुणोत्तर १.७७ टक्क्यांनी सुधारले. संपूर्ण कर्जाचे कर, व्याज व घसारापूर्व नफ्याशी असलेले गुणोत्तर ६.८५ टक्के इतके ३१ मार्च २०२२ ला होते. ते ३१ मार्च २०२३ला ५.०८ टक्के इतके सुधारले. जैन इरिगेशनचे रिवूलिसमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर नवीन कंपनीत १८.७ टक्के भागभांडवल राहील. याची किंमत १३.७५ कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी राहील. अचानक एखादा होणारा फायदा : कामकाज बंद असलेल्या यंत्रांची विक्रीतील फायदा १२३४.६६ कोटी रुपये हे मागील आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये घडले.

एकल निकाल आढावा २०२३ची चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ रोजी संपणारे आर्थिक वर्ष कंपनीने किरकोळ बाजारातील उत्तम मागणीमुळे उत्पन्नात भरपूर वाढ नोंदवली आणि त्यात मुख्य म्हणजे पाईप विभागास दक्षिण व पश्चिम क्षेत्राहून अधिक मागणी आणि जल जीवन मिशनची चौथ्या तिमाहीतील सतत मागण्यांमुळे वरील उत्पन्नात भरीव वाढ झाली.

चौथ्या तिमाहीत हायटेक विभागाच्या २६.६ टक्के वाढ चौथ्या तिमाहीत तर ३१ मार्च २०२३ अखेर २३.८ टक्के वाढ कंपनीने साध्य केली. याचे कारण म्हणजे सध्याचे प्रकल्प, किरकोळ बाजारातून खूप ऑर्डर्स आणि टिश्यूकल्चर व्यवसायात झालेली वाढ आहे.
कंपनीच्या प्लास्टीक विभागाने चौथ्या तिमाहीत आणि ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात अनुक्रमे ५६.१ टक्के आणि ३५.९ टक्के वाढ नोंदवली. याचे कारण म्हणजे महाराष्ट्र व दक्षिणेकडील राज्यात असलेल्या पीव्हीसी पाईपच्या भरपूर ऑर्डर्स व जल जीवन मिशनमध्येसुद्धा चांगली वाढ झाली.

उत्तम नफ्याचे मार्जिन, कामकाजातील कार्यक्षमतेत झालेली वाढ आणि कारखान्यातील  क्षमतेच्या वापरातील चांगल्या वाढीमुळे चौथ्या तिमाहीत कर, व्याज व घसारापूर्व नफा (इबीआयडीटीए) ६८.८ टक्क्यांनी वाढला.  कंपनीने मागील वर्षात १८३.९ कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज फेडले. पण एनसीडीच्या ६९.39 कोटी रुपयांच्या व्याजाची नोंद रिव्हर्स केल्यामुळे निव्वळ कर्जातील घट ९२.० कोटी रुपये राहिली.

ऑर्डर्स बुक :- सध्या कंपनीच्या ऑर्डर्स पुस्तकामध्ये  १३२७.८ कोटी रुपयांच्या संपूर्ण ऑर्डर्स हातात आहेत. त्यापैकी हायटेक अॅग्री इनपुट विभागाच्या ५९२.४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत व ७३५.४ कोटी रुपये प्लास्टिक विभागाच्या ऑर्डर्स आहेत.
एकत्रित निकाल आढावा २०२३ची चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ रोजी संपणारे आर्थिक वर्ष कंपनीच्या सर्व व्यवसायात नोंदवलेली उत्पन्नात वाढ ही भारतामध्ये सगळ्या विभागात झालेली आहे. कंपनीच्या उत्पन्नातील वाढ ही प्लास्टिक आणि अन्न प्रक्रिया विभागात नफ्याच्या मार्जिनमध्ये सुधारणा झाल्यामुळे कंपनीच्या कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात (इबीआयडीटीए) सुधारणा झाल्यामुळे कंपनीने साध्य केली.

चौथ्या तिमाहीत हायटेक विभागाने सध्या चालू असलेल्या प्रकल्पाचे पूर्ण झालेले काम, उत्पादनांना किरकोळ बाजारातील जास्त मागणी आणि भारतातील कंपनीचा टिश्यूकल्चर विभागातसुद्धा जास्त मागणी आहे. यामुळेच हायटेक विभागात भरपूर वाढ शक्य झाली. भारतातील निर्जलीकृत कांद्याच्या चांगल्या ऑर्डर्स असल्यामुळे अॅग्रो विभागाची चांगली वाढ झाली. कंपनीच्या फळभाजीपाला प्रक्रियात भारतात आणि जगात पण चांगली वाढ कंपनीने नोंदवली.

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये विलीनीकरण केलेल्या (Discontinned) विभागातून मिळालेले उत्पन्न २२३२.१ कोटी रुपये (आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये  २३८६.१ कोटी रुपये) आणि कर, व्याज व घसारापूर्व नफा (इबीआयडीटीए) २१६.२ कोटी रुपये/९.७ टक्के (आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३८३.६ कोटी रुपये/१६.१ टक्के)

ऑर्डर्स बुक:- सध्या कंपनीच्या हातात ऑर्डर्स पुस्तकामध्ये  २३५४.८ कोटी रुपयांच्या संपूर्ण ऑर्डर्स हातात आहेत. त्यापैकी हायटेक अॅग्री इनपुट विभागाच्या ५९२.४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत, ७५७.१ कोटी प्लास्टीक विभागाच्या ऑर्डर्स व १००५.३ कोटी रुपये अॅग्रो प्रक्रिया विभागाच्या ऑर्डर्स आहेत.

आम्हाला ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या चौथी तिमाही आणि आर्थिक वर्षाचे आर्थिक निकाल जाहीर करतांना अतिशय आनंद होत आहे.  कंपनीने सर्व व्यवसायात उत्पन्नात भरपूर वाढ  नोंदवली आहे व नफादेखील आमच्या अपेक्षेनुसार आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देखील कंपनी आपली जोरदार वाढ चालू ठेवेल अशी आमची आशा आहे. सकारात्मक ऑर्डर्समुळे आमच्या सर्व व्यवसायात कंपनी पूर्ण ताकदीने प्रयत्न करुन धाेरणांची अंमलबजावणी करेल. आम्ही वाढीचा दर साध्य करु आणि तरीही ताळेबंदावर लक्ष केंद्रित करत आहोत. कंपनीने एकत्रित चौथ्या तिमाहीच्या उत्पन्नात Y ON Y बेसिसवर २७ टक्क्यांची वाढ साध्य केली आणि ते १७४५ कोटी रुपयावर पोहोचले. (कर, व्याज व घसारापूर्व नफा मार्जिन [इबीआयडीटीए] १४.१ टक्के). तसेच कंपनीने ३१ मार्च २०२३ अखेरीस एकत्रित उत्पन्न २१.४ टक्क्यांनी वाढून ते ५७४८ कोटी रुपये नोंदवले (कर, व्याज व घसारापूर्व नफा मार्जिन [इबीआयडीटीए] १२.७ टक्के). एकत्रित निकालात कंपनीने संपूर्ण वर्षात ४५ कोटी रुपयांच्या खेळत्या भांडवलात रोख व एकल निकालात कंपनीने संपूर्ण  वर्षात ३९३.१ कोटी रुपये रोख प्रवाह (कॅश फ्लो) निर्माण केला. निव्वळ खेळत्या भाडवलाच्या चक्रात २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ६४ दिवसांची सुधारणा कंपनीने केली आहे. तसेच कंपनीने जल जीवन मिशन अंतर्गत रेट काँट्रॅक्ट करारावर महाराष्ट्रात पुरवठा सूरु केला आहे. तसेच कंपनी सातत्याने नफ्याचे मार्जिन आणि कॅश फ्लो मध्ये सुधारणा करत आहे आणि ते दीर्घ काळात आमचे लक्ष्य गाठायला मदत करेल. सध्या एकत्रित बेसिसवर कंपनीच्या हातात २३५४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत.
-अनिल जैन
(उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनच्या जळगाव परिमंडलाची कार्यकारिणी जाहीर

July 25, 2025
क्रीडा

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

June 21, 2025
गुन्हे

घरात घुसून तरूणीला मारण्याची धमकी देत वृध्देला मारहाण !

June 17, 2025
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 जून 2025

June 13, 2025
गुन्हे

उपचारासाठी नेते सांगत महिलेचे दागिने नेले चोरुन !

June 12, 2025
जळगाव

रक्त दिलं आणि जीव वाचवायला हेल्मेटही मिळालं

June 7, 2025
Next Post

जैन हिल्स जळगाव येथे फालीच्या ९ व्या संमेलनात ; १५५ शाळांमधील १०८५ विद्यार्थ्यांचा असणार सहभाग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आशादीप वसतीगृहातील सत्य नेमकेपणाने समोर यायलाच हवे : दिलीप तिवारी

March 3, 2021

पंकजा मुंडे अन् विनोद तावडे भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी

September 26, 2020

महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल ९९.६३% टक्के

August 3, 2021

हरयाणा निकाल : तपास होईपर्यंत ईव्हीएम सील करण्याची काँग्रेसची मागणी !

October 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group