बोदवड (प्रतिनिधी) शहरात पाणी पुरवठा योजनेबाबत गट विकास आराखड्यात गट क्रमांक २१४ मध्ये जलशुद्धीकरण केद्र व मलनिस्सारण व मलशुध्दीकरण केद्रंप्रस्तावित विषय विकास आराखडा दुरूस्ती करणे तसेच स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेसाठी नगरपंचायतकडून लागणारा आपला आर्थिक हिस्सा, वित्तीय संस्था व बँकेकडून कर्ज उभारणी करणे, या विषयावर विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. तर प्रभाग क्र.४ च्या सदस्याचे निधन झाल्याने पोटनिवडणुक जाहीर झालेली असल्याने निवडणूक आयोगाच्या परवानगीने ही सभा बोलवण्यात आली होती.
या सभेत अनेक वर्षांपासून बहूप्रतिक्षीत पाण्याचा प्रश्न असुनही विरोधकांसह दोन सत्ताधारी नगरसेवक अनुपस्थित राहीले आणि ह्या दोन्ही विषयाची एकमताने पारीत असलेला ठराव हा स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक होता. तरीही सभेमध्ये सत्ताधारी गटाचे आठ नगरसेवक हजर असल्याने दोन्ही विषय बहुमताने पास झाले. यावेळी विरोधी गटातील राष्ट्रवादीचे स्विकृत नगरसेवक दिपक झांबड मात्र, सभेला उपस्थित होते. यामुळे विरोधी नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. या विशेष सभेत पीठासीन अध्यक्ष आनंदा पाटील उपनगराध्यक्ष रेखा गायकवाड सदस्या पुजा जैन, शारदा बोरसे, मनिषा बडगुजर, बेबीबाई माळी, मीराबाई माळी, स्विकृत नगरसेवक राजेश नानवानी व राष्ट्रवादीचे दिपक झांबड असे आठ नगरसेवक व स्विकृत दोन असे दहा नगरसेवक हजर होते.तर विरोधी गटाच्या गटनेते सह सहा नगरसेवक गैरहजर होते.
स्वतंत्र पाणी पुरवठा योजना ही १०२ कोटींची असुन यात ५ टक्के म्हणजे ५ कोटी १४ लाख रूपये नगरपंचायत आपला हिस्सा भरावा लागणार आहे या योजनेचा पाण्याचा स्त्रोत तापी नदीवरील मेढोळले गावाजवळून राहील सातोड गावामध्ये जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाईल याला सोलर प्लांट व विद्यूत विज जोडणी सुध्दा असेल तर सिरसाळा येथे १२ लाख २६ हजार लिटर क्षमतेचा जंलकुभ उभारले जाणार तेथून उतार असल्याने ते पाणी शहरात आज सध्या सात लाख लिटर पाणी क्षमतेचे जंलकुभ आहे यात नवीन १५ लाख ५०लिटर क्षमतेचे तिन जंलकुभ उभारण्यात येईल या योजनेत स्रोत पासून ते जंलकुभ पर्यंत ५०० मि.मि.व्यासाचा व जलशुद्धीकरण केंद्र पासून ४०० मि.मि.व्यासाची जलवाहिनी वापरली जाईल तरी ह्या योजनेची तांत्रिक मान्यता मिळाली असून प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालय येथे प्रस्तावित आहे. त्या साठी आजच्या सभेचा ठराव आवश्यक होता तरी निसर्ग कन्सल्टन्सी नेमण्यात आली आहे. तरी आजच्या सभेसाठी नगरपंचायत नगरसेवक एकुण संख्या १७ असुन एक सदस्य मयत असल्याने सध्या संख्या १६ आहे यातुन एकद्वीत्यांश सख्या विशेष सभेसाठी लागते त्यानूसार आठ सदस्य हजर असल्याने ठराव मंजूर झाला. या विशेष सभेमुळे आचार संहिताभंग झाल्याची तक्रार विरोधी राष्ट्रवादीगटाचे जफर शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली आहे.तसेच नियमानुसार सात दिवस आधी मिटींग अजेंडा न देता २३ तारखेच्या मिटींगचा अजेंडा २२ तारखेला देण्यात आला व ठराव क्रमांक २ हा निवडणूक जाहीर असलेल्या प्रभाग ४ संबंधित आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे असे तक्रारीत नमूद आहे.