मुंबई (वृत्तसंस्था) सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण हा विषय अतिशय गंभीर आहे. माझ्याकडे तक्रारी द्या मी चौकशी करतो. संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशी होईल, अशी घोषणा आज सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारणात अनेकवेळा असे प्रसंग येतात की त्यात माणसाचं पूर्ण राजकीय आयुष्य आणि केलेली पुण्याई पणाला लागते. पण, समोर आलेल्या प्रकरणातील काही तक्रारी असतील, तर त्याची चौकशी आम्ही करू. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून याचा तपास करतील. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या पटलावर पेन ड्राईव्ह ठेवला आहे. यात सर्व पुरावे असून या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.















