चांदिवली (वृत्तसंस्था) ऑल इंडिया मुस्लीम इत्तेहादूल मुसलमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लीम आरक्षणासाठी ठाकरे सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून जोरदार टीका केली आहे. ज्यादिवशी भारतातील मुसलमान एकत्र येईल, त्या दिवशी सर्व घाबरतील. आपण जिंकू शकत नाही, हे आपल्या डोक्यातून काढून टाका, असंही ते म्हणाले.
ओवैसी पुढे म्हणाले, मुंबईत राहुल गांधी येतील तेव्हा १४४ लागेल का, धर्मनिरपेक्षतेमुळं आपल्याला आरक्षण मिळालंय का, चार टक्के मुस्लिम ग्रॅज्युएट झालेत का? असे अनेक सवाल उपस्थित करत त्यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. महाराष्ट्रातील खासदार फक्त मराठा आरक्षणासंदर्भात संसदेत मुद्दे मांडतात. मुस्लिम आरक्षणाबाबत कोणीही बोलत नाही. शिवसेना धर्मनिरपेक्ष आहे का, पवार साहेब तुम्हाला दुःख वाटत नाही का? ज्यावेळी बाबरी मशिद आम्ही पाडली, असं शिवसेना उद्धव ठाकरे म्हणतात. काँग्रेस पूर्णपणे कमजोर झालीय. आता काँग्रेसमध्ये काहीही उरलं नाही, असंही ते म्हणाले.
ज्यादिवशी भारतातील मुसलमान एकत्र येईल, त्या दिवशी सर्व घाबरतील. आपण जिंकू शकत नाही, हे आपल्या डोक्यातून काढून टाका, असं केलं, तरच मुस्लिमांचा विजय शक्य आहे. कोणी मला म्हटलं होऊ शकत नाही, तर मी होऊ शकतं, असं म्हणत असतो, त्यामुळं सकारात्मक राहा मुस्लिमांनी स्वतःच्या हक्कासाठी लढलं पाहिजे, ओमिक्रॉन येईल की नाही हे कोणाला माहिती नाही. मात्र, बुस्टर डोस नागरिकांना द्यायला हवा. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारनचं याकडं दुर्लक्ष केलंय, असं म्हणत ओवैसींनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मी मुसलमानांना बुस्टर डोस दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण मिळालंच पाहिजे. हा मुस्लिमांचा अधिकार आहे. आरक्षणानेच विकास होणार आहे. २० टक्के मुसलमान वर्षाला फक्त २० हजार कमवतात. चार टक्के मुसलमानच पदवीधर झाले आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मस्जिद पाडली, त्याच्यावर आम्हाला गर्व आहे, असे मुख्यमंत्री म्हणतात. त्यावर कोणीच काही बोलत नाही. थ्री इन वन सरकारला आरक्षणाचा विसर पडलाय. हायकोर्टान मुस्लिम आरक्षणाला मान्यता दिलीय. मात्र, हे सरकार आरक्षण द्यायला तयार नाही. ८३ टक्के नागरिकांकडे जमीन नाही. कच्च्या घरात राहणाऱ्यांमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी आहे. एक आणि दोन रूमच्या खोलीत राहणाऱ्या मुस्लिमांची संख्याही मोठी आहे. चार आणि पाच खोल्यांत राहणाऱ्या मुस्लिमांची संख्या सरकारकडे नाही. मुसलमानांना शिकायचं आहे. मात्र, त्यांना शिकता येत नाही आहे. कारण, त्यांच्याकडे पैसे नाही. मुसलमानांना आरक्षण द्या. ते शिकल्याशिवाय राहणार नाहीत. धर्मनिरपेक्षतेमुळे मुसलमानांना काय मिळालं. आरक्षण मिळालं का? काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेनं हात मिळवत महाराष्ट्राला लुटण्याचं ठरवलंय, असा घणाघातही त्यांनी केला.