लासुर ता.चोपडा (प्रतिनिधी) येथील जीवनज्योती फाऊंडेशन, नानासो .ए.के.गंभीर मित्र परिवार आणि श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तमनगर येथे आदिवासी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
परिसरातील काही आदिवासी पाडे असेही आहेत ते दिवाळी चा आनंद दारिद्यामुळे साजरा करू शकत नाही त्यांच्या चेहऱ्यावर हा आनंद देण्यासाठी जीवनज्योती फाऊंडेशन, नानासो.ए.के.गंभीर मित्र परिवार आणि श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने संकल्प करून दिवाळी च्या दिवशी लासूर गावापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेले आदिवासी पाडा उत्तमनगर येथे दिवाळी साजरी करण्यात आली. लासूर येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नानासाहेब ए के गंभीर, कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष कैलास बाविस्कर, जीवन ज्योती फाऊंडेशनचे अध्यक्ष मास्टर टेलर्स, सह सचिव दिलीप पालीवाल, नाटेश्वर पीक संरक्षण लासुरचे माजी व्हा चेअरमन किशोर माळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर येथील सर्व कुटुंबासोबत संध्याकाळी उपस्थित राहून १५० कुटुंबाना दिवाळी निमित्त फरसाण व गोड पदार्थ घरोघरी देऊन तसेच भाऊबीज निमित्त १० आदिवासी महिलांना नवी साडी भेट देवून दिवाळी साजरी करण्यात आली. सर्व सदस्यांच्या हस्ते साडी चे व फरसाण चे घरोघरी वाटप करण्यात आले आहे. सर्व आदिवासी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याचा दैवी आनंद या सर्व मित्र परिवाराने घेतला “जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले” अशा प्रकारच्या खुपच व्यक्ती समाजामध्ये असतात, अगदी मनापासुन समाजकार्य त्या करतात व इतरांपुढे आपला आदर्श ठेऊन समाजाप्रतिचे आपले ऊत्तर दायित्व प्रत्येक्ष कृती करुणच दाखवुन देतात.
स्वतासाठी जगत असतांना आपण समाजाचे काही तरी देनलागलो. आपल्याला सारे काही त्यांच्यापेक्षा सहज मिळाले आहे.घेण्यापेक्षा देण्याची वृत्ती हि श्रेष्ट असते. माणसाने माणसातील माणूसपण जागे ठेवणे हि काळाची गरज आहे. त्यासाठी जास्तीत-जास्त लोकांनी अशा उपक्रमात सहभागी झाले पाहिजे. आणि अशा आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिला पाहिजे
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लासुर येथील माजी सरपंच देवीलाल बाविस्कर सर हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून लासूर येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नानासाहेब ए के गंभीर, नाटेश्वर पीक संरक्षण सो सा लासुरचे माजी व्हा चेअरमन किशोर माळी, किसान विद्या प्रसारक मंडळाचे माजी संचालक मुरलीधर सोनवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य नागेश बिडकर, जीवन ज्योती फाऊंडेशनचे अध्यक्ष मास्टर टेलर्स, सह सचिव दिलीप पालीवाल, संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन, सावता महाराज पतसंस्थेचे संचालक हिम्मतराव माळी, कैलास महाजन, ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक महाजन,वासुदेव महाजन,सुरेश महाजन,लासुर वि का चे माजी चेअरमन एन टी माळी,नाटेश्वर पीक संरक्षण सो सा चे संचालक राजू भाऊसाहेब, A – 1 क्लासेस चे संचालक राहुल पाटील, सामाजिक कार्यकर्ते विरु जैन, श्रीराम पाटील, शिवसेना गट प्रमुख देविदास मगरे, युवा सेना संघटक शोएब खान, पत्रकार परेश पालीवाल, इंजि.भूषण महाजन, ज्ञानेश्वर मगरे, दिपक माळी, प्रेमराज शेलकर, कृष्णा शेलकर, समाधान माळी, दिनेश पाटील, हर्षल जावरे, उत्तम नगर येथील पोलीस पाटील नरसिंग पावरा, आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच अनेक दानशूर व्यक्तींनी या ऊपक्रमासाठी सहकार्य केले. सदर कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष देवीलाल बाविस्कर, नानासो.ए के गंभीर, हिम्मतराव माळी, कैलास महाजन व राहुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
















