अमळनेर (प्रतिनिधी) अतुल परचुरे यांनी ‘कलर्स मराठी’ टी.व्ही. वर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे संपूर्ण धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून कायद्यानुसार अतुल परचुरे आणि ‘कलर्स मराठी’ टीव्ही चॅनेल यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मौर्य क्रांती व सकल धनगर समाज प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अतुल परचुरे यांनी ‘कलर्स मराठी’ टी.व्ही. वर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे संपूर्ण धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून कायद्यानुसार अतुल परचुरे आणि ‘कलर्स मराठी’ टीव्ही चॅनेल यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी व ‘कलर्स मराठी’ टीव्हीचे प्रक्षेपण लायसन्स रद्द करावे अशी आग्रही मागणी मौर्य क्रांती संघ आणि सकल धनगर समाज प्रतिष्ठान अमळनेर यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करण्यात आली असून उभय नेत्यांना पाठवावयाचे निवेदन अमळनेरचे तहसिलदार मिलींद वाघ साहेब यांना देण्यात आले.
यावेळी तहसिलदार यांना भेटलेल्या शिष्टमंडळात व निवेदनावर स्वाक्षरीचा समावेश असलेल्यांमध्ये सकल धनगर समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष बन्सीलाल अण्णा भागवत, सचिव एस.सी. तेले , प्रा. डी. व्ही. भलकार, समाधानभाऊ धनगर, प्रभाकर नाना लांडगे, प्रा.जी. एल. धनगर, सकल धनगर समाज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नितीन आबा निळे, खजिनदार प्रदीप कंखरे, मच्छिंद्रआबा लांडगे, तुषारभाऊ धनगर, आनंदा धनगर आदींचा समावेश होता.