चोपडा (प्रतिनिधी) येथील सुफल संदेश जैन याची इंग्लंडच्या जगातील नवव्या क्रमांकाच्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे इनोवेशन अँड इंटरप्रिनर्शीप अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे विशेष म्हणजे या विद्यापीठात महात्मा गांधी,रवींद्रनाथ टागोर,ग्रॅहम बेल,दादाभाई नौरोजी,नेल्सन मंडेला यांनी शिक्षण घेतले आहे. सुफलने बीई (मेकॅनिकल)चे शिक्षण घेतले असून त्याला या विद्यापीठाची सोळा लाख रुपयांची शिष्यवृत्तीही मंजूर झाली आहे. सुफल हार्डवेअर व्यावसायिक अॅड. संदेश जैन यांचा मुलगा असून त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.