बोदवड (प्रतिनिधी) येथे आज जिवाजी महाले यांची ३८७ वी जयंती श्री संत सेनाजी महाराज सभागृह बोदवड येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवरक्षक जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन जिवाजी संघटनेचे अध्यक्ष रितेश बिडके ,सोपान महाले यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून जिजाऊ वंदना ने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी सोपान महाले रितेश बिडके गणेश सोनोने अमोल आमोदकर विवेक वखरे,संजय वाघ, गजानन भोंडेकर, हरिभाऊ सुरंसे, निवृत्ती ढोले, अनंत वाघ आदींनी जिवाजी महाले यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकत अभिवादनपर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन जिवाजी संघटनेचे पदाधिकारी यांनी केल. या कार्यक्रमाला विजय बोरणारे, अक्षय बोरनारे, शरद बोरनारे, दिलीप बोरनारे, गणेश बोरणारे, किशोर डापसे, गणेश सोनवणे प्रकाश बाभुळकर, निवास बाभुळकर, गोपाल वखरे, गोपाल बोरसे, नितीन आमोदकर, शुभम वाशिमकर, शंकर अंबुस्कर, प्रशांत भोंडेकर आदी उपस्थित होते.














