मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपालांनी कल अधिवेशन बोलावण्याची जी तत्परता दाखवली. तीच तत्परता 12 आमदारांच्या शिफारशीसाठी दाखवली असती तर त्यांच्याबाबतचा आदर वाढला असता, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी केले आहे. ते मुक्ताईनगर येथे बोलत होते.
यावेळी खडसे म्हणाले, की भारतीय जनता पार्टीचे नेते काल राज्यपालांना भेटले आणि महाविकास आघाडी सरकारवर अविश्वास ठराव आणा अशी मागणी केली. राज्यपालांनीही तत्काळ उद्या अधिवेशन बोलवण्याचे सूचना सरकारला केली. मात्र राज्यपालांनी जेवढी तत्परता काल दाखवली तशीच तत्परता गेले दोन वर्ष झाले 12 आमदारांची शिफारस मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे केली आहे. त्या आमदारांची यादी तत्परतेने मंजूर केली असती तर राज्यपालांविषयीचा आदर वाढला असता, असा टोला लगावला आहे.
‘हे कृत्य घटनाबाह्य’ असून
राज्यपालांनी आपला निर्णय देण्याआधी काही अवधी द्यायला पाहिजे होता. कोणी भेटायचे तसेच अविश्वास ठरावाची मागणी, अधिवेशन या काही प्रक्रियांना नियम असतात. तत्काळ असे निर्णय घेणे हे कृत्य घटनाबाह्य आहे. एकूणच राज्यपालांच्या भूमिकेवर एकनाथ खडसे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, कोर्टाने विश्वासदर्शक ठरावाचा राज्यपालांचा निर्णय फेटाळून लावला तर काय होईल, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.