पुणे (वृत्तसंस्था) पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन, जे सत्य आहे ते उघड होईल, अशी शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयकर खात्याच्या धाडीवर प्रतिक्रिया व्यक्त केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने काल छापेमारी केली. यासोबतच अजित पवार यांच्या बहिणींच्या घर, कार्यालयांवरही आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. अजित पवारांच्या बहीण रजनी इंदुलकर यांच्या घरी सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाचे अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि झाडाझडती सुरू आहे. जवळपास २७ तासांपासून ही कारवाई सुरू आहे.
“पाहुणे आलेत, ते गेल्यावर बोलेन…” आयकर विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईवर अजित पवार म्हणाले, “पाहुणे वेगवेगळ्या घरात आहेत त्यांचं काम चालू आहे ते गेल्यावर मला काय बोलायचं आहे ते मी बोलेन. ते गेल्यावर मला काय भूमिका मांडायची आहे ती मांडेल. नियमाने जे असेल ते जनतेच्या समोर येईन त्यात घाबरायचं काय कारण”. जवाहरालाल छाजेड, मुकेश बग्रेचा, राजेंद्र घाडगे, सचिन शिनगारे, विरधवल जगदाळे यांच्याकडे काल साखर कारखान्याच्या संदर्भाने धाडी पडल्या होत्या.
सचिन शिनगारे, विरधवल जगदाळे, राजेंद्र घाडगे, जरंडेश्वर, दौंड शुगर, जरंडेश्वर,आणि अंबालिका येथे आलटून पालटून डायरेक्टर होते. काल काय म्हणाले होते अजित पवार? अजित पवार यांनी गुरुवारी प्रतिक्रिया देत म्हटलं, आयकर विभागाने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे. जर आयकर विभागाला काही शंका असतील तर ते छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित असणाऱ्या काही कंपन्यांवर छापेमारी झाली आहे.
दरवर्षी आम्ही टॅक्स भरणारे आहोत. मी राज्याचा अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची, कुठला कर कसा चुकवायचा नाही, व्यवस्थितपणे टॅक्स कसा भरायचा हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे माझ्या सर्व कंपन्या, माझ्याशी संबंधित कंपन्यांचे टॅक्स वेळोवेळी भरले जातात. त्यात कुठलीही अडचण नाही.
आयकर विभागाची धाड राजकीय हेतूने ही राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने रेड टाकली की त्यांना आणखी काही माहिती हवी होती हे इन्कम टॅक्सचे अधिकारीच सांगू शकतील. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्यावर मला काही बोलायचं नाहीये. कारण मी सुद्धा एक नागरिक आहे असंही अजित पवारांनी म्हटलं.