जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टीव्ह रुग्ण) संख्या ५७१ पर्यत खाली आली आहे. आज (दि.८ नोव्हेंबर) ६८ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ५१ हजार ७०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.५६ टक्क्यांपर्यत पोहोचले आहे. जिल्ह्यात आज १८ नवीन रुग्णांचे निदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
जिल्ह्यात आज रोजी एकूण 571 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अवघी 190 इतकी आहे यातील 26 रुग्ण आयसीयुमध्ये असून 94 रुग्णांना ऑक्सिजन वायु सुरु आहे. तर 381 रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1272 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून सध्या जिल्ह्यातील मृत्यूदर 2.38 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 लाख 93 हजार 967 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 53 हजार 550 (18.21 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या 198 अहवाल प्रलंबित आहे. सध्या जिल्ह्यात 369 व्यक्ती गृह अलगीकरणामध्ये आहेत तर 107 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय पॉझिटिव्ह, बरे झालेले, मृत्यु व सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती
जळगाव शहरात आतापर्यंत 12235 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 11727 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 272 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 236 रुग्ण उपचार घेत आहेत. जळगाव ग्रामीणमध्ये आतापर्यंत 2544 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 2442 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 80 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 22 रुग्ण उपचार घेत आहेत.
भुसावळ तालुक्यात आतापर्यंत 4 हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 3736 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 159 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 105 रुग्ण उपचार घेत आहेत.
अमळनेर तालुक्यात आतापर्यंत 4415 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 4282 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 103 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 30 रुग्ण उपचार घेत आहेत.
चोपडा तालुक्यात आतापर्यंत 4383 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 4282 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 73 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 28 रुग्ण उपचार घेत आहेत.
पाचोरा तालुक्यात आतापर्यंत 1944 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 1865 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 72 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 7 रुग्ण उपचार घेत आहेत.
भडगाव तालुक्यात आतापर्यंत 1901 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 1844 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 42 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 15 रुग्ण उपचार घेत आहेत.
धरणगाव तालुक्यात आतापर्यंत 2189 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 2128 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 50 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 11 रुग्ण उपचार घेत आहेत.
यावल तालुक्यात आतापर्यंत 1773 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 1691 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 62 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 20 रुग्ण उपचार घेत आहेत.
एरंडोल तालुक्यात आतापर्यंत 2795 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 2732 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 48 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 15 रुग्ण उपचार घेत आहेत.
जामनेर तालुक्यात आतापर्यंत 4130 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 4035 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 73 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 22 रुग्ण उपचार घेत आहेत.
रावेर तालुक्यात आतापर्यंत 2208 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 2098 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 99 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 11 रुग्ण उपचार घेत आहेत.
पारोळा तालुक्यात आतापर्यंत 2496 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 2468 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 10 रुग्ण उपचार घेत आहेत.
चाळीसगाव तालुक्यात आतापर्यंत 3537 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 3452 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 75 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 10 रुग्ण उपचार घेत आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात आतापर्यंत 1732 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 1688 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 33 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 11 रुग्ण उपचार घेत आहेत.
बोदवड तालुक्यात आतापर्यंत 836 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 809 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 14 रुग्ण उपचार घेत आहेत.
इतर जिल्ह्यातील आतापर्यंत 432 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी 428 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 00 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या 4 रुग्ण उपचार घेत आहेत.