चोपडा ( प्रतिनिधी) शहरातील कॉलनी परिसरातील रस्त्यांची दुर्दशा पाहता नगरपालिकेवर किव आल्याशिवाय राहत नाही. कॉलनी परिसरातील लोकांना रस्त्याच्या पायवाट काढुन घरापर्यंत जेमतेम जाण्याच्या मार्ग करावा लागतो. नगरपालिकाने त्वरीत लक्ष दयावे असे सामान्य माणसाचे म्हणणे आहे.
धनवाडी फाटा ते परिस पार्क पर्यंत रोडाची चाळणी झाली आहे.
कॉलनी परिसरातील व धनवाडी कडे खेड्यांवर जाणारे अनेक अनेक लोकांचे अतोनात हाल होत आहेत धनवाडी फाटा ते परिस पार्क हा रस्ता म्हणजे सापळा झालेला आहे. येथे रस्ता दिसतच नाही सर्वदुर पाण्याने भरलेले डबकेच दिसतात. ठिकठिकाणी मोठ मोठे डबके साचल्यामुळे गाडी चालवणे कठीण होत आहे. तसेच पायी चालणाऱ्यांना तर कसरतच करावी लागते आणि त्यातच येणाऱ्या जाणाऱ्या मोटारसायकल मोठ्या गाड्या घाण पाणी रोडावरचे पाणी उडवून जात असतात. त्यात शाळकरी मुलांचे ड्रेस देखील खराब होतात. त्यावेळी भानगड होत असतात मात्र या ठिकाणी नगरपालिका जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे की, काय? असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. अन्यथा काही दिवसात स्थानिक लोकांच्या संयम सुटेल आणि नगरपालिकेवर धडक मोर्चा जाईल असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.
रस्त्यावर मुरूम जरी टाकले गेले तरी रस्त्याची स्थिती काही प्रमाणात सुधारेल.परंतु नगरपालिका मात्र कुंभकर्णाची झोप घेत आहे. या कुंभकर्णाच्या झोपेतून नगरपालिकेला जागे करण्यासाठी लोकांना एल्गार पुकारा लागेल की,काय ? असे देखील येथील नागरिक म्हणत आहे.