जळगाव (प्रतिनिधी) ‘अफगाणिस्तान’मध्ये पंतप्रधानपद रिक्त झाले आहे. काँगेसच्या भावी पंतप्रधानांनी भारतात वेळ न घालवता तिकडे संपर्क साधावा’, असं वादग्रस्त ट्विट खा. पाटील यांनी केले आहे.
खासदार उन्मेष पाटील यांनी अफगाणिस्तानात होत असलेल्या सत्ता बदलावरून काँग्रेसवर खोचक टीका आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी यांचा भावी पंतप्रधान असा उल्लेख केला जातो. अफगाणिस्तानचे अध्यक्ष कोण होणार, याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. त्या अनुषंगाने खासदार पाटील यांनी ही टीका केल्याचे बोलले जात आहे. ‘अफगाणिस्तान मध्ये पंतप्रधानपद रिक्त झाले आहे, काँगेसच्या भावी पंतप्रधान यांनी भारतात वेळ न घालवता तिकडे संपर्क साधावा’, असं ट्विट पाटील यांनी केलं आहे. या टीकेवर अद्याप तरी राज्यातील कोणत्याही काँग्रेस नेत्यांनी उत्तर दिलेले नाही.