बोदवड (प्रतिनिधी) आपल्या कुटुंबात वाढदिवस साजरा न करता रोज ज्या बालकांसोबत आंगणवाडीत वेळ जातो, त्याच बालकांसोबत अंगणवाडी सेविकेने आपला वाढदिवस साजरा करून भेट वस्तू देत चिमुकल्यांना आंनदीत केले.
येवती ता. बोदवड येथील अंगणवाडी सेविका संगीता सुदाम शेजवळकर यांनी स्वतःचा पन्नासावा वाढदिवस अंगणवाडीतील बालकांसोबत साजरा केला. या वेळी त्यांनी आंगणवाडीतील बालकांसाठी मिठाई,अल्पोहार आणला तसेच सर्व बालकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या भेट दिल्या. सर्व बालक आपल्या आंगणवाडीबाईंचा वाढदिवस साजरा करताना आंनदीत झाले. तसेच बालकांसोबत आंगणवाडीत आलेले पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.