जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव आणि Indian Immunologicals Ltd, Hyderabad (ILL) एन.डी.डी.बी. ची सलंग्न संस्था यांच्या संयूक्त विद्यमाने सामूहिक जंत निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी संघाचे चेअरमन आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघाचे कार्यकारी संचालक शैलेश एस. मोरखडे आणि डेबोज्योती चटोपाध्याय (Zonal Incharge, IIL, NDDB) यांच्या प्रमूख उपस्थितीत दौलत महिला सहकारी दूध उत्पादक सोसायटी लि. करजगाव (ता. चाळीसगाव) या ठिकाणी आयोजीत करण्यात आला होता. अशा प्रकारचा कार्यक्रम संघाच्या इतिहासात प्रथमच राबविण्यात आला.
या अभूतपूर्व कार्यक्रमास चाळीसगाव तालूक्यातील व लगतच्या परिसरातील दूध उत्पादक तसेच महिला दूध उत्पादक प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमांत सुरुवातीस दिप प्रज्वलन करुन गो-पूजन करण्यात आले. उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमांत ज्या महिला दूध उत्पादकांनी दूध उत्पादक संस्थांना जास्तीत जास्त दूध पुरवठा अर्थात प्रती दिन ९० लीटर्स केला आहे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात प्रामुख्याने विठाबाई प्रभाकर दराडे यांचा समावेश होता.
संघाचे चेअरमन आमदार मंगेशदादा यांनी उपस्थित दूध उत्पादकांना जंत निर्मूलनाचे महत्व विषद केले. तसेच शासनाने दूध उत्पादकांसाठी जाहिर केलेल्या प्रती लीटर रु. ५.०० प्रमाणे अनूदान थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत, अशी सखोल माहिती दिली. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी आपल्या दूध संस्थेमार्फत संघास दूध पुरवठा करावा अशी विनंती केली. सदरच्या कार्यक्रमाचे लाईव्ह टेलिकास्ट जिल्हयातील सर्व प्राथमिक दूध उत्पादक संस्थांवरुन दाखविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत सुमारे २७,००० दुधाळ जनावरांसाठी जंत निर्मूलनाच्या गोळयांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमांचे यशस्वीतेसाठी स्थानिक दूध उत्पादक तसेच दौलत महिला सहकारी दूध उत्पादक सोसायटी लि. करजगांव, ता. चाळीसगांव संस्थेचे चेअरमन मिनाबाई मोरे पंचकमेटी व महिला दूध उत्पादक सदस्या तसेच नाना महाराज तोंडेदादा, शांताराम महादू दराडे, नारायण झिपरु पाटील, माजी सरपंच, प्रमिलाबाई भिकन पाटील, सरपंच, करजगाव (ता. चाळीसगाव) तसेच पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. कोतकर साहेब, गौरव लक्ष्मण गायकवाड, निकितेश निर्मल, वरिष्ठ अधिकारी (ILL) एन.डी.डी.बी. इ. यांनी अथक परिश्रम घेवून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले.