जळगाव (प्रतिनिधी) भिलवाडा येथील घोडास डांगमध्ये राहणाऱ्या सरजुदास महाराज याला अल्पवयीन मुलीचे यौन शोषण केल्याच्या प्रकरणात राजस्थान पोलिसांनी डिसेंबर महिन्यात अटक केली होती. (Mahant Sarju Das Maharaj arrested in Bhilwara) याच प्रकरणात आता जळगावच्या शाहुनगरमधील हनुमान मंदिरात रसरजूदासचे शिष्य बालकदास यांच्याकडे शुक्रवारी भिलवाडा पोलिसांनी चौकशी करुन त्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त एका दैनिकाने प्रसिध्द केले आहे. दरम्यान, पिडीता जळगावतील एका तरूणाच्या संपर्कात होती. दोघांच्या व्हाटसअप चॅटींगमधून पोलिसांना महत्वपूर्ण पोलिसांना मिळाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. (Jalgaon Crime News)
कोण आहेत सरजुदास महाराज?
रसजुदासचे आश्रम जळगाव, बद्रीनाथ व आयोध्या येथे आहेत. तसेच ते भिलवाडाच्या घोडास डांग येथे पाच मोठ्या आश्रमांचे प्रमुख आहेत. देशभरात त्यांचे शेकडो भक्त आहेत. जळगाव शहरात सुमारे १० ते १५ वर्षांपासून शाहूनगरमधील तपस्वी हनुमान मंदिरात सरजूदास महाराजांचे वास्तव्यास होते.
आश्रमातच अत्याचार केल्याचा आरोप !
कोरोना काळात सरजुदास यांनी आश्रमातच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. आश्रमातून काही महत्वपूर्ण कागदपत्र भिलवाडा पोलिसांना मिळाले आहेत. तक्रारकर्त्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबाबानुसार सरजुदास यांनी आत्महत्या करण्याची धमकीदेत तीच्यावर अत्याचार केले. पिडीत मुलगी पोलिसात गेल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली अाहे. एका पिडीतेसह आणखी दोन तरुणींनी सरजुदास यांच्या विरुद्ध जबाब दिले आहेत. तर दुसरीकडे पिडीतेच्या आईवर अॅसिड हल्ला केल्याबाबतचाही महंत सरजूदास यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
जळगावमधील तरुणाच्या मोबाईलमधून मिळाला महत्वपूर्ण पुरावा !
जळगावातील एक तरुण घोडास आश्रमात कधी कधी जात होता. यातून त्याची ओळख पिडीत अल्पवयीन मुलीसोबत झाली. दोघांमधील व्हाटसअप चॅटींगमध्ये पिडीत मुलीने सरजुदास यांनी केलेल्या दुष्कृत्य करत असल्याचे जळगावच्या तरुणाला सांगितले होते. पोलिसांनी संबंधित तरुणाचा मोबाईल जप्त करत तपासणी केली असता, व्हाटसअप चॅटींग मिळून आली आहे. पोलिसांच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण पुरावा आहे. पिडीतेने हा विषय इतरांना का सांगितला नाही?, असे पोलिसांनी विचारले असता सरजुदास यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली म्हणून आपण कुणालाही सांगीतले नसल्याचा जबाब दिला आहे.
जळगावातील तरुणावर प्रचंड दबाव ?
दुसरीकडे अल्पवयीन पीडितेवर अत्याचाराचा गुन्हा आपल्या अंगावर घ्यावा, यासाठी जळगावातील तसेच आश्रमाशी जोडला गेलेल्या तरुणावर प्रचंड दबाव आणला जात असल्याचे वृत्त एका दैनिकाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार घडलेली घटना व अत्याचाराला हाच तरुण जबाबदार असल्याचे भासवून त्याचे नाव गुंतवण्यासाठी भिलवाडासह जळगावातील काही मंडळी सक्रिय असल्याने या तरुणाची भिलवाडा (राजस्थान) येथील मंडल पोलिस ठाण्यात सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली. त्याच्या मोबाईलसह इतर तपासण्या करण्यात येऊन जबाब नोंदवून त्या तरुणाचा सहभाग नसल्याची खात्री झाल्यावर त्याला मुक्त करण्यात आल्याचे म्हटले आहे.
राजस्थान पोलीस जळगावात धडकले, चौकशीसाठी शिष्याला घेतले ताब्यात? !
जळगावातील एका अल्पवयीन मुलीसोबत मेाबईलवर चॅटींगनंतर सरजुदासचे संबध समोर आले आहेत. यानंतर हे प्रकरण आता जळगावपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस अधीक्षक चंचल मिश्रा यांच्या पथकातील उमेश कुमार, प्यारचंद जळगावात आले होते. त्यांनी संशयिताविरुद्ध इतर गुन्हे दाखल आहेत काय? याची माहिती घेतली. तर दुसरीकडे सरजुदास यांचे शिष्य म्हणवणारे बालकमहाराज हे शाहुनगरातील हनुमान मंदिराचे प्रमुख आहेत. भिलवाडा पोलिसांनी शुक्रवारी (६ डिसेंबर) जळगावात येऊन बालकदास महाराज यांची चौकशी करून चौकशीसाठी बालकदास यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त एका दैनिकाने प्रसिध्द केले आहे. परंतू या या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान, मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा बालकदास यांच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात दाखल आहे.
(फोटो : सरजूदास महाराजला अटकेनंतर कोर्टात नेतांना राजस्थान पोलीस)